लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी लग्नानंतर नऊ वर्षांनी आई होणार आहे. ‘मधुबाला’ मालिकेत मुख्य भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली ही अभिनेत्री मागच्या काही काळापासून अभिनयापासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक मजेदार व्हिडीओ शेअर करत तिने ती गरोदर असल्याची गुड न्यूज दिली होती. पण काही लोक ती गरोदर नसल्याचं म्हणत ट्रोल करत होते. या ट्रोलर्सला तिने उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दृष्टी धामी व तिचा पती नीरज खेमका लवकरच नवीन सदस्याचं स्वागत करणार आहेत. गुड न्यूज दिल्यानंतर दृष्टी सातत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत आहे, पण अनेकांना वाटलं की ती गरोदर नाहीत कारण तिचा बेबी बंप दिसत नाही. त्यामुळे दृष्टी खरंच गरोदर आहे की वजन वाढल्यामुळे तिचं पोट दिसतंय, बेबी बंप खोटा आहे का? असं तिला युजर्स कमेंट्स करून विचार होते. याबद्दल तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

‘क्रिश’मध्ये हृतिक रोशनची भूमिका करणारा बालकलाकार आता ‘या’ क्षेत्रात करतोय काम, व्हिडीओ चर्चेत

हल्ली बऱ्याच अभिनेत्रींना गरोदर नसून गरोदर असल्याचं नाटक करत असल्याचं म्हणत ट्रोल केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोणने ती गरोदर असल्याची घोषणा केल्यानंतर तिलाही ट्रोल केलं गेलं होतं. जणू प्रत्येक महिलेल्या गरोदरपणाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा ट्रेंड वाढतोय. आता दृष्टीलाही अशाच कमेंट्सचा सामना करावा लागला. त्यानंतर तिने लाल कफ्तान सेटमधील स्वतःच्या काही सुंदर फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यावर कॅप्शन लिहिलं आहे.

फिल्मी करिअर फ्लॉप पण लक्झरी आयुष्य जगतो सुझान खानचा भाऊ, जायेद खानच्या संपत्तीचा आकडा वाचून चकित व्हाल

दृष्टीने लाल कफ्तानमध्ये तिचा बेबी बंप दाखवला आणि तिला प्रश्न विचारणाऱ्यांना प्रश्न विचारला आहे. “माझा बेबी बंप हा फक्त जेवणामुळे वाढलेलं पोट नाही याचा पुरावा. मला विचारणाऱ्या सर्वांसाठी आता तुम्हाला बेबी बंप दिसतोय का?” असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं.

दरम्यान, दृष्टीने १४ जून रोजी एक व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती. “लवकरच एक लहान बाळ आमच्या आयुष्यात येणार आहे. प्लीज आम्हाला प्रेम, आशीर्वाद, कॅश आणि फ्रेंच फ्राईज पाठवा. बाळ वाटेत आहे. ऑक्टोबरची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत,” असं तिने व्हिडीओ शेअर करताना लिहिलं होतं.

दृष्टी धामी व नीरज खेमका यांनी सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१५ मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दृष्टीचा पती नीरज हा बिझनेसमन आहे. आता लग्नाच्या नऊ वर्षांनी हे दोघे आई-बाबा होणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular actress drashti dhami reply trollers who called her baby bump fake see video hrc