मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी अभिजित पानसे ओळखले जातात. तसेच ते लोकप्रिय निर्माते आणि लेखकही आहेत. सध्या ते ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबरोबर अभिनेत्री क्रांती रेडकर आणि नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील हे दोघं सुद्धा परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतं आहेत. याचनिमित्तानं अभिजित पानसे यांनी एका एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी बोलताना लावणीविषयी खंत व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “मारझोड करून इस्लाम स्वीकारण्यास…” राखी सावंतचा पतीबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, “दोन वेळा घटस्फोट…”

‘मीडिया टॉक मराठी’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी नुकताच अभिजित पानसे यांनी संवाद साधला. यावेळेस त्यांना विचारलं गेलं की, ‘तुम्ही परीक्षण करताना सादर झालेल्या लावणीबद्दलची पार्श्वभूमी सांगताना दिसता. जसे की ऑरिजनल ती लावणी सादर करताना त्या अभिनेत्रीनं काय केलं होतं वगैरे, असं बरंच काही तुम्ही सगळं सांगत असता. हे सगळं कसं काय जमतंय?”

हेही वाचा – “…म्हणून आदिल मला टार्गेट करतोय”; राखी सावंतने सांगितली कारणे, म्हणाली…

या प्रश्नावर अभिजित पानसे म्हणाले की, “अल्प प्रमाणात आधीच्या अनुभवाचा उपयोग होतो आहे. पण जेव्हा ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमासाठी होकार दिला. तेव्हा अर्थातच माझ्या स्वभाव प्रमाणे लावणी संदर्भातली जुनी पुस्तक मागवली. लावणीचा थोडासा इतिहास तपासला. लावणी कशी घडली? यासंदर्भाची पुस्तक वाचल्यानंतर आनंददायी होतं की, लावणीचा फार मोठा इतिहास आहे. ४०० वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास आपल्याला उपलब्ध आहे.”

हेही वाचा – तेजश्री प्रधानबरोबर ‘प्रेमाची गोष्ट’ सेटवर कसं आहे नातं? शुभांगी गोखले म्हणाल्या, “तो बालिशपणा…”

पुढे अभिजित पानसे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लावणीचा गुप्तहेर म्हणून उपयोग झालेला आहे. ही लोककलेची मोठी परंपरा आहे. लावणी सम्राज्ञी असंख्य होऊन गेल्या. पण लावणीकडे बघण्याचा दृष्टीकोन कायम छोटा, कमी प्रतिची गोष्ट म्हणून राहिला. याचा आता खूप त्रास होतो. एवढ्या समृद्ध लोककलेविषयी वाचनात असं वाटतं होतं की, अशा प्रकारचे कार्यक्रम केवळ चॅनेलवरचं नाही तर महाराष्ट्रात आणि जगभर व्हायला पाहिजे.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular director abhijit panse talk about lavani dance pps