मराठी सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार मंडळी आहेत, ज्यांनी आपल्या कामाने हिंदीत एक वेगळी छाप उमटवली आहे. सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, अनुजा साठे, क्षिती जोग यांसारख्या कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने हिंदीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहेच. त्याचप्रमाणे अनेक मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शकांनी देखील हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. मराठी दिग्दर्शकांच्या हाताखाली तयार झालेले बरेच हिंदी चित्रपट ब्लॉकबस्टर सुद्धा ठरले आहेत. असेच एक लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव.
रवी जाधव यांनी मराठीसह हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजचे दिग्दर्शन केलं आहे. अलीकडेच त्यांनी दिग्दर्शित केलेली ‘ताली’ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. असे हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ नव्या पर्वात हजर राहिले होते. त्यांच्याबरोबर दिग्दर्शक विजू माने देखील या मंचावर उपस्थित होते.
हेही वाचा – स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका ‘या’ मालिकेचा रिमेक?
या आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा मैत्री स्पेशल भाग होता. त्यानिमित्ताने या भागात रवी जाधव यांच्या आयुष्यातील एका खास मित्राने त्यांना सरप्राइज दिलं. हा मित्र म्हणजे रवी जाधव यांचे मोठे बंधू. त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून रवी जाधव यांना सरप्राइज दिलं. याचा व्हिडीओ ‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. जो सध्या चांगलाच चर्चेत आहे.
या व्हिडीओत, रवी जाधव यांचा संघर्ष थोडक्यात त्यांचे मोठे बंधू सांगताना दिसत आहेत. ‘नटरंग’ चित्रपट बनवताना कशा प्रकारे अडथळे आले? असं सर्व काही त्यांनी या व्हिडीओतून सांगितलं आहे.
हेही वाचा – स्टार प्रवाहवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद?, प्रेक्षकही म्हणाले, “अखेर तो क्षण आला…”
हेही वाचा – अवघ्या तीन महिन्यातच गुंडाळावी लागली ‘ही’ मालिका; अचानक घेतला प्रेक्षकांचा निरोप
दरम्यान, रवी जाधव यांच्या कुटुंबियांचा हा साधेपणा नेटकऱ्यांना चांगलाच भावला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि प्रतिक्रियेच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केलं आहे.