टेलिव्हिजनवरील काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करतात. त्या मालिकेतील डायलॉग्स, पात्र प्रेक्षकांच्या जीवनाचा भाग होतात. पुढे मालिका बंद झाल्या तरी प्रेक्षकांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी त्या मालिका आठवणीत राहतात. या मालिकेची शीर्षकगीतं किंवा एखादा डायलॉग जरी प्रेक्षकांनी पाहिला तरी त्यांच्या मनात नॉस्टॅल्जियाची भावना येते. अशीच भावना आता प्रेक्षकांना पुन्हा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. कारण ‘सीआयडी’ आणि ‘आहट’ या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. हिंदीत या मालिकांचे गाजलेले भाग आता मराठीत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
‘सीआयडी’ आणि ‘आहट’ या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. आजवर या मालिका हिंदी भाषेत आपण पहिल्या, पण आता या मालिका मराठीत पाहता येतील. ‘सीआयडी’ आणि ‘आहट’ या मालिकांचे विशेष असे काही भाग आपल्याला मराठीमध्ये पाहता येतील. हा थराराचा एक तास सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल. सत्याचा शोध घेण्यासाठी एसीपी प्रद्युम्न आणि त्यांची टीम येत असून ‘दया तोड दो दरवाजा’ हा डायलॉग प्रेक्षकांना आता मराठीत ऐकता येणार आहे; तर ‘आहट’ मालिकेतील भय आता प्रेक्षक मराठीत अनुभवू शकणार आहेत. या दोन्ही मालिकांचं मराठीत प्रक्षेपण सुरू झालं असून या मालिका प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पाहता येतील. ‘सीआयडी’ आणि ‘आहट’ या मालिका गुरुवार ते रविवार प्रेक्षकांना सोनी मराठी वर पाहायला मिळणार आहे.
टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय आणि आवडती क्राईम मालिका म्हणजेच सी आय डी (CID). आजवर टेलिव्हिजनवरील सगळ्यात जास्त काळ असलेली मालिका म्हणजेच सीआयडी. या मालिकेतील एसीपी प्रद्युमन, दया आणि अभिजीत अशी सगळीच पात्र सुपरहिट ठरली. संपूर्ण टीम मिळून घडलेल्या गुन्ह्यामागील सत्य शोधून काढायचे. या मालिकेने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता हाच कार्यक्रम आणि हीच सुपरहिट पात्र मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हो, CID मालिका सोनी मराठी वाहिनीवर आता मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांची आवडती पात्रं आता मराठीतून दिसणार आहेत. तसेच ‘आहट’ ही एक थ्रिलर, हॉरर टेलिव्हिजन मालिका आहे. जवळ जवळ २० वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्या काळातील ती सगळ्यात थरारक मालिका ठरली. ही मालिका आता मराठीतून प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. सोनी मराठी वाहिनीवर या मालिकांच्या विशेष भागांचे प्रक्षेपण सुरू झाले आहे.
७ नोव्हेंबरपासून ‘सीआयडी’ मालिका रात्री ९.३० वाजता प्रसारित व्हायला सुरुवात झाली आहे, तर ‘आहट’ या मालिकेचं प्रसारणसुद्धा १०.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळू शकते.
© IE Online Media Services (P) Ltd