‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. तर आता ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातही ती महाराणी येसूबाईंची भूमिका साकारताना दिसत आहे. या नाटकाच्या निमित्ताने सध्या तिचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यानिमित्त अनेक ठिकाणांना ती भेट देत आहे. या दरम्यानचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर नुकताच पोस्ट केला.
उत्तम अभिनयशैली आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर प्राजक्ता आज विशेष लोकप्रिय आहे. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्राजक्ताही चाहत्यांशी अनेक नवनवीन गोष्टी शेअर करत असते. नुकतीच तिने नाशिकमधील एका ऍग्रो टुरिझम प्रकल्पाला भेट दिली. तिथे गेल्यावर सुरुवातीला तिला भीती वाटू लागल्याचं तिने पोस्टमध्ये सांगितलं.
आणखी वाचा : Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली
प्राजक्ताने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये ती पोपटांना खेळताना दिसत आहे. यात ती निळ्या, पांढऱ्या, लाल अशा विविध रंगांच्या पोपटांबरोबर दिसत आहे. एका पोपटाला तिने खांद्यावर घेतले, तर नंतर दुसऱ्या पोपटाला तिने तिच्या हातावर बसवले, आणखी एका पोपटाला नंतर तिने कणीस खाऊ घातले असं व्हिडीओमध्ये दिसत आहे. परंतु हे सगळं करत असताना सुरुवातीला ती घाबरलेली दिसली. पण नंतर मात्र तिने त्या पोपटांना जवळ घेऊन त्यांच्या अंगावरून हात फिरवला. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने लिहिलं, “आधी खूप घाबरले आणि नंतर खूप छान मैत्री झाली.”
प्राजक्ताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत तिचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. तर अनेकांनी तिचा हा व्हिडीओ आवडल्याचं कमेंट करत सांगितलं आहे.