मराठी मालिका, वेबसीरिज, चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता फक्त इथवरच थांबली नाही तर तिने आता स्वतःचा व्यवसायही सुरू केला आहे. प्राजक्तराज हा तिचा नवा ज्वेलरी ब्रँड तिने लाँच केला आहे. एकाचवेळी अनेक कामांमध्ये प्राजक्ता व्यग्र आहे. दरम्यान यामधूनच छोटा ब्रेक घेत ती श्री श्री रवीशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात पोहोचली होती.

आणखी वाचा – सैफ अली खानचं लग्न झाल्यावर लेकापासून विभक्त राहू लागल्या शर्मिला टागोर, म्हणाल्या, “आईला गृहित धरलं जातं कारण…”

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
marathi actor siddharth khirid propose to girlfriend in goa
दोन देश, दोघांचं करिअरही वेगळं…; मराठी अभिनेत्याने गर्लफ्रेंडला गोव्यात घातली लग्नाची मागणी; म्हणाला, “२२ एप्रिल २०२२…”

महाशिवरात्रीनिमित्त काही दिवस प्राजक्ता श्री श्री रवीशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात गेली. यादरम्यानचे काही फोटो व व्हिडीओ तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. आश्रमात बसून तिने जप केला. तिच्यासाठी हा अनुभव आनंदीदायी होता. या आश्रमातीलच प्राजक्ताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये प्राजक्ता श्री श्री रविशंकर यांना प्रश्न विचारताना दिसत आहे. तिचा हा प्रश्न लग्नाबाबत आहे. प्राजक्ता विचारते, “लग्न करणं गरजेचंच आहे का?”. यावर श्री श्री रविशंकर यांनी उत्तर दिलं की, “तू मला विचारत आहेस. असं असतं तर कधीच माझ्या बाजूला अजून एक खुर्ची लागली असती. लग्न केलंच पाहिजे हे काही गरजेचं नाही.”

आणखी वाचा – Video : …अन् भर पार्टीत जमिनीवर बसून रणबीर कपूरचा भन्नाट डान्स, ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

“खूश राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही लग्न करुन खूश राहा किंवा एकटं खूश राहा. काही लोक लग्न करुनही दुःखी असतात. तसेच एकटं राहिले तरी दुःखीच असतात. तुम्ही निवडा तुम्हाला नेमकं कसं राहायचं आहे. आनंदी राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.” प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Story img Loader