मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने अभिनय कौशल्याने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून प्राजक्ताला लोकप्रियता मिळाली. या मालिकेत साकारलेल्या मेघना या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. प्राजक्ताने मालिकांबरोबरच चित्रपटांत काम करुनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर नाव कमावत अनेक पुरस्कार नावावर केले. नुकतंच तिला ‘झी युवा सन्मान २०२३’ या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं. ‘तेजस्वी चेहरा’ हा पुरस्कार देऊन प्राजक्ताचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंकर प्राजक्ताने काही फोटो शेअर करत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे.
हेही वाचा>> ‘बाहुबली’ फेम अभिनेत्याला एका डोळ्याने दिसत नाही, किडनीही केली ट्रान्सप्लांट, म्हणाला “त्यांनी मृत्यूनंतर…”
हेही वाचा>> मराठीतील प्रसिद्ध संगीतकाराच्या लावणीमध्ये झळकणार गौतमी पाटील! गायकाबरोबरचा ‘तो’ फोटो व्हायरल
प्राजक्ताने ट्रॉफी ठेवलेल्या घरातील कोपऱ्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने “घरातले २ कोपरे कौतूकानं भरत चाललेत ह्याचा खूप आनंद आहे…(फोटोत दुसरा दिसत नाहीये.) परवा “झी युवा सन्मान २०२३ तेजस्वी चेहरा पुरस्कार” मिळाला. पाठीवर कौतुकाची थाप मिळाली की प्रोत्साहन मिळतं, उत्साह वाढतो…#कृतज्ञ #आनंद #धन्यवाद…श्रेय: आई- वडील, ध्यान, प्राणायाम, योगा आणि हास्यजत्रेला..”, असं कॅप्शन दिलं आहे.
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे. अनेकांनी प्राजक्ताला शुभेच्छाही दिल्या आहेत. प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.