‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांसह प्राजक्ता माळीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे कलाकार तिच्या कर्जत येथील ‘प्राजक्तकुंज’ फार्महाऊसवर गेले होते. याचा खास व्हिडीओ अभिनेत्री वनिता खरातने तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “फक्त खोटी आश्वासने आणि दिशाभूल”, नामांकित विमान कंपन्यांवर अनिकेत विश्वासराव संतापला, नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळीने हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमबरोबरचे फार्महाऊसवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता वनिताने या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडीओ खास हास्यजत्रेच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत वनिता लिहिते, “प्राजक्ताने फार्महाऊस घेतलं आणि आम्ही तिथे पार्टी करायला गेलो नाही ऐसा हो नहीं सकता! प्राजक्ता माळीच्या फार्म हाऊसवर आम्ही खूप धमाल मस्ती केली.”

हेही वाचा : “‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकात एन्ट्री होताच प्रेक्षक भुवनेश्वरी, भुवनेश्वरी ओरडू लागले अन्…”; कविता मेढेकर सांगितला किस्सा, म्हणाल्या…

निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त ‘प्राजक्तकुंज’ बंगला, स्विमिंग पूलमध्ये कलाकारांनी केलेली मजा याची झलक वनिताच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अरुण कदम, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, सचिन गोस्वामी, समीर चौघुले, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, सचिन मोटे, ओंकार राऊत अशी हास्यजत्रेची संपूर्ण टीम प्राजक्ताच्या फार्महाऊसवर गेली होती. नेटकरी वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : मेंदू सकट “होल बॉडी मसाज”

दरम्यान, प्राजक्ताला वाढदिवसाची भेटवस्तू म्हणून या संपूर्ण टीमने फोटोफ्रेम गिफ्ट केली आहे. ही फोटोफ्रेम कर्जतच्या फार्महाऊसवर लावणार असल्याचं प्राजक्ताने या कलाकारांना सांगितलं आहे. वनिताने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta mali birthday celebration with maharashtrachi hasya jatra team actress vanita kharat shared video sva 00