Prajakta Mali Birthday : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आज तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीवर संपूर्ण मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे प्राजक्ता घराघरांत लोकप्रिय झाली. यानंतर हळुहळू ती चित्रपटांकडे वळली. सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे या शोमधल्या बहुतांश कलाकारांनी प्राजक्तासाठी खास पोस्ट लिहिल्या आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता प्रसाद खांडेकरने प्राजक्ता माळीसाठी तिच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सर्वात आधी प्रसादने अभिनेत्रीला तिच्या आगामी ‘फुलवंती’ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आज वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने या चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यामुळे प्रसादने अभिनयासह पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलेल्या प्राजक्ताचं कौतुक केलं आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”
Uday Samant Post About Loksatta
Uday Samant : “‘लोकसत्ता’चा लोगो वापरुन खोडसाळ पोस्ट”, ‘त्या’ पोस्टवर काय म्हणाले उदय सामंत?

हेही वाचा : Prajakta Mali : नऊवारी साडी, मराठमोळा साज अन्…; प्राजक्ता माळीने वाढदिवसानिमित्त दिली आनंदाची बातमी; म्हणाली, “तुमच्या मनावर…”

प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद खांडेकरची खास पोस्ट

“Happy वाला बर्थडे प्राजू… तुझा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘फुलवंती’ चित्रपटाची रिलीज डेट तू आज जाहीर केलीस…त्याबद्दल तुझं अभिनंदन! अभिनयाबरोबरच तुझं शिवोहम, प्राजक्तराज, कविता संग्रह, प्राजक्त प्रभा अशा तुझ्या आगामी काळात येणाऱ्या सगळ्या बिझनेसची भरभराट होवो हिच प्रार्थना” अशी पोस्ट शेअर करत प्रसाद खांडेकरने अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) ‘फुलवंती’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात आपलं पाऊल टाकत आहे. हा चित्रपट पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारलेला आहे. प्राजक्ताने गेली अनेक वर्षे यावर अभ्यास केलेला आहे. त्यामुळे अभिनेत्री या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहे. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता यामध्ये कोणकोणते कलाकार झळकतील याचा उलगडा हळुहळू करण्यात येईल.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “हिल हिल पोरी हिला…”, दादा कोंडकेंच्या गाण्यावर निक्की तांबोळी व अरबाज पटेलचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

Prajakta Mali
प्राजक्ता माळी ( Prajakta Mali )

दरम्यान, प्रसाद खांडेकरप्रमाणे अमृता खानविलकर, प्रार्थना बेहेरे, स्वप्नील जोशी, नम्रता संभेराव अशा अनेक कलाकारांनी प्राजक्तासाठी ( Prajakta Mali ) पोस्ट शेअर करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader