मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. फेसबुक, इन्स्टाग्रामवर प्राजक्ताचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमीच तिच्या कामाचे अपडेच आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अर्थात अनेकदा यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. मात्र तिचे असे अनेक चाहते आहेत जे नेहमीच पाठिंबा देताना दिसतात. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर एवढी लोकप्रिय आहे की आता एका चाहत्याने तिला चक्क प्रपोजही केलं आहे.

प्राजक्ता माळी तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. तिचे फोटो अनेकदा व्हायरल होतात तसेच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेतही असतात. नुकतेच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यावर कमेंट करताना एका चाहत्याने तिला थेट प्रपोज केलं आहे. याशिवाय इतरही अनेक चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट करताना प्राजक्ताचं कौतुक केलं आहे.

cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
pravin tarde shares special post on the occasion of wife snehal tarde
“स्वतःचं घरदार आणि संसार सांभाळून…”, प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहलसाठी खास पोस्ट! मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या भावना
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य

आणखी वाचा- “माझ्यावर टीका केली जातेय हे…” सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल प्राजक्ता माळीने व्यक्त केलं स्पष्ट मत

प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्रामवर जांभळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने लिहिलं, “इतरांच्या सावलीखाली राहण्यापेक्षा ती नेहमीच काळोख्या वाटेवर एकटी चालण्याला प्राधान्य देते.” प्राजक्ता माळीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले असून एका चाहत्याच्या कमेंटमुळे अभिनेत्री खूप चर्चेत आली आहे. प्राजक्ताच्या फोटोवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिलं, “मी तुझ्यावर प्रेम करतो तुझे प्रतीक महिला सशक्तीकरण आणि मजबूत व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राची सामाजिक परंपरा ब्यूटी क्वीन मी पण तुझ्यावर प्रेम करतो.”

आणखी वाचा- “मला ते करायचे नव्हते, पण…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सूत्रसंचालनाबद्दल प्राजक्ता माळी स्पष्टच बोलली

prajakta mali instagram

चाहत्याच्या या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र प्राजक्ताने या चाहत्याला अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या कमेंटमुळे ती सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अलिकडेच एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेली होती. काही दिवसांपूर्वीच ती हे शूटिंग संपवून भारतात परतली आहे. मात्र या चित्रपटाचं नाव, स्टार कास्ट किंवा इतर कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.