मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. प्राजक्ताच्या वडिलांचा वाढदिवस नुकताच पार पडला. याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
प्राजक्ताच्या वडिलांना जुळी बहीणही आहे. त्यांचा ६१वा वाढदिवस माळी कुटुंबियांनी साजरा केला. ६१व्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ताचे बाबा व तिच्या आत्याचे ६१ दिव्यांनी औक्षण करण्यात आले. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोला तिने “पप्पा आणि आत्या – या जुळ्या भावंडांची ६१ वी…” असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोवर चाहत्यांनीही लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा >> आधी हाताने खेचलं, मग थेट दबंग स्टाइलने लाथ मारुन अमृता धोंगडेने तोडलं जेल; ‘बिग बॉस’ने सुनावली कठोर शिक्षा
प्राजक्ता तिच्या कुटुंबियाबरोबरचे फोटो अनेकदा तिच्या सोशल मीडियावरुन शेअर करताना दिसते. प्राजक्ताला एक भाऊही आहे. आपल्या भाच्यांबरोबरचे क्यूट फोटोही प्राजक्ता पोस्ट करत असते.
हेही वाचा >> लेक पाळण्यात असतानाच अभिनेत्री बनवण्याचं स्वप्न बघतेय आलिया भट्ट? म्हणाली…
‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेली प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्राजक्ताने मालिकांसह चित्रपटांतही काम केलं आहे. ‘पावनखिंड’, ‘चंद्रमुखी’, ‘लकडाऊन लग्न’ या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली होती.