मराठी मनोरंजनसृष्टीतील गोड अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी, आपल्या अभिनयाच्या जोरावर प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘जूळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून प्राजक्ता घराघरांत पोहचली. प्राजक्ताचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. निरनिराळे व्हिडीओ व फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता प्राजक्ताची एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. एकाने लिहिले “अरे वा हिरो नंबर १ बरोबर आमच्या महाराष्ट्राची क्रश नंबर १..दुग्ध शर्करा योग” तर दुसऱ्याने “तू आली तेव्हा मंदिरात होतो आम्ही..खूप स्तुती केली जात होती लोकांकडून. विशेष हास्य जत्रा बघणाऱ्या लोकांकडून.” अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी प्राजक्ताच्या सौंदर्य व साधेपणाचे कौतुकही केले आहे.

हेही वाचा- Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’कार्यक्रमातील कलाकारांचा सिंगापूर दौरा! वनिता खरातच्या पतीने शेअर केला खास व्हिडीओ

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर मालिका, चित्रपट, वेबसीरिजमधून प्राजक्ताने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘तीन अडकून सिताराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटात तिच्याबरोबर वैभव तत्त्ववादी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्राजक्ताची ‘रानबाजारी’ ही वेबसीरिजही प्रचंड गाजली. आता लवकरच तिचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta mali great bhet with bollywood superstar govinda actress shares photo dpj