Actress Prajakta Mali : ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेच्या माध्यमातून ती मेघनाच्या रुपात प्रेक्षकांसमोर आली अन् हळुहळू ‘वाह दादा वाह’ म्हणत प्रेक्षकांच्या मनावर तिने आपली एक वेगळी छाप उमटवली. अर्थात त्या बहुरंगी अभिनेत्रीचं नाव आहे प्राजक्ता माळी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठी मालिका, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन याचबरोबर वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून प्राजक्ता गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या काही वर्षात प्राजक्ता माळीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. प्राजक्ता उत्तम अभिनेत्री आहेच पण, याशिवाय ती एक दमदार व्यावसायिका म्हणून देखील उदयास आली आहे. या सगळ्या कामाच्या व्यापात एक अभिनेत्री म्हणून आपल्या फिटनेसकडे लक्ष देणं देखील खूप महत्त्वाचं असतं. याबद्दलच एक पोस्ट शेअर करत प्राजक्ताने चक्क सध्याचं तिचं वजन काय आहे याचा खुलासा कॅप्शनमध्ये केला आहे.

हेही वाचा : ‘जमाल कुडू’ची व्हायरल झालेल्या डान्स स्टेपमागची प्रेरणा काय? बॉबी देओल खुलासा करत म्हणाला, “मी लहान असताना…”

प्राजक्ता माळीची पोस्ट

कधी नव्हे ते (कष्ट न घेता) छान कॉलरबोन्स दिसायला लागलेत. कधी नव्हे ते #jawline यायला लागलीए…कधी नव्हे ते गालावरचं बाळसं उतरलंय… आजूबाजूचे म्हणायला लागलेत; एवढी बारीक नको होऊस, आणि मला तर वजन ५० करायचंय. (आता ५१ आहे.) म्हटलं Insta family आणि महाराष्ट्राला विचारूया, तुम्हाला काय वाटतं. प्राजक्ता तुम्हांला कशी आवडते? कमेंट्समध्ये नक्की सांगा
१- वजन ५१ ok आहे.
२- वजन ५० कर.
३- वजन ५३ with #chubbycheeks.

प्राजक्ता माळीच्या ( Prajakta Mali ) या पोस्टवरून तिचं वजन सध्या ५१ किलो असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता भविष्यात प्राजक्ताला तिने समोर ठेवलेल्या टार्गेटनुसार ५० किलो वजन करायचं आहे. यावर नेटकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “प्रामाणिकपणे, सांगू तू खूप सुंदर आहेस”, “प्राजू आम्हाला कशी पण आवडते”, “एवढंच राहू दे आता वजन… खूप कमी नको करूस” अशा कमेंट्स प्राजक्ताच्या चाहत्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘अशी’ होते रिहर्सल! शिवालीने केलं भन्नाट ‘टंग ट्विस्टर’, मालवणी भाषा अन्…; पाहा व्हिडीओ

प्राजक्ता माळीचं सध्याचं वजन किती ? ( Prajakta Mali )

दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) सध्या तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्रीने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. तिच्या या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक देखील करण्यात आलं. यामध्ये प्राजक्तासह अभिनेता गश्मीर महाजनीने प्रमुख भूमिता साकारलीये, याशिवाय या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्नेहल तरडे यांनी सांभाळली आहे.