आपल्या अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठी मनोरंजनसृष्टीत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांबरोबरचे विविध फोटो, व्हिडीओ, वैयक्तिक आयुष्यात आलेले अनुभव ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. यामुळेच तिच्या चाहत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. प्राजक्ता माळीच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या अशाच एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : Video : दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘सुभेदार’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान गाडी; म्हणाली, “आदरपूर्वक आणि संयमानं…”

Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Ruta Awhad Sparks Controversy osama bin laden apj abdul kalam
Video: “ओसामा बिन लादेन दहशतवादी म्हणून जन्मला नाही, त्याला समाजानं…”, जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीकडून अब्दुल कलाम आणि लादेन यांची तुलना
CM Eknath Shinde his party leaders turning their backs on Mathadi Mela become topic of discussion
नवी मुंबई : माथाडी राजकारणाला शिंदे गटाची बगल? मराठाबहुल मेळाव्यावर भाजपचा प्रभाव
eknath shinde mathadi workers
माथाडी राजकारणाला शिंदे सेनेची बगल ? मराठा बहुल मेळाव्यावर भाजपचा प्रभाव
Pragya Daya Pawar opposition to the role of Vanchit Bahujan Aghadi which is protesting in front of the house of intellectuals
‘वंचित’च्या भूमिकेचा स्त्री लेखिका-कार्यकर्तींकडून निषेध
Nana Patekar praised Ajit Pawar, Nana Patekar,
“अजित पवार त्यांच्या पद्धतीने खूप मोठे काम करत आहेत”, नाना पाटेकर यांनी केले कौतुक; राजकारणात न जाण्याचे सांगितले कारण
Tirupati Prasad Controversy
Prakash Raj: ‘तुझ्या दिल्लीतील मित्रांमुळे धार्मिक तणाव’, तिरुपती प्रसाद वादावर अभिनेते प्रकाश राज यांची पवन कल्याण यांच्यावर टीका

नवरात्र उत्सवानिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळी नागपूरला गेली होती. यावेळी एका कार्यक्रमाच्या आयोजकांशी समन्वय साधून अभिनेत्रीला नितीन गडकरी यांची भेट घेता आली. या भेटीचा संपूर्ण अनुभव अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : लग्नाआधी प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखने घेतलं नवीन घर? दारावरच्या नेमप्लेटने वेधलं लक्ष

प्राजक्ता माळीची पोस्ट

मी आणि केंद्रिय मंत्री नितीनजी नागपूरात एका कार्यक्रमानिमित्त एका मंचावर उपस्थित राहण्याचा योग जुळून येता येता राहिला. आयोजकांना म्हटलं, सहज शक्य झालं तर मला त्यांना भेटायला खूप आवडेल आणि नितीनजींनी तात्काळ वेळ दिला. नवमीला नितीनजींच्या निवासस्थानी ही ‘ग्रेट भेट’ झाली. त्यामुळे सबंध परिवारालाही भेटता आलं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, माझे आगामी projects, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग’…अशा अनेक विषयांवर अर्ध्या तासाहून अधिक वेळ गप्पा झाल्या. ‘श्री श्रींचं माझ्यावर पुत्रवत प्रेम आहे आणि आम्ही तुमची हास्यजत्रा रोज बघतो’ हे ऐकून मला विशेष आनंद झाला..निघताना त्यांच्या घरच्या देवीचं दर्शन घ्यायला लावलं, त्यांच्या कामावर लिहिली गेलेली ८-९ पुस्तकं दिली, नैसर्गिक कापसापासून बनवलेली खादी साडी दिली. (जी मी लगेच दुसऱ्या दिवशी विजयादशमी उत्सवात नेसली. ) आयुष्यभर स्मरणात राहील अशा या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल नितीनजींचे मनापासून आभार.

हेही वाचा : “स्वत:च्या मुलींचे चेहरे दाखवत नाही अन्…”, नेटकऱ्याच्या टीकेला क्रांती रेडकरने दिलं थेट उत्तर; म्हणाली, “जबाबदारी…”

प्राजक्ताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. दरम्यान, यंदाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुद्धा प्राजक्ता माळी अतिथी म्हणून मंचावर उपस्थित राहिली होती. लागोपाठ राजकीय क्षेत्राशी संबंधित भेटीगाठी केल्याने प्राजक्ताच्या काही चाहत्यांनी तिला राजकारणात प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे.