प्राजक्ता माळी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते. अत्यंत बिनधास्त आणि दिलखुलास स्वभावाच्या प्राजक्ताचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. प्राजक्ता देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी तिच्या चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने केलेलं एक वक्तव्य खूप चर्चेत आलं आहे.
प्राजक्ता शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून वेळात वेळ काढून विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असते. नुकतीच ती एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. या दरम्यान ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिला सलमान खान खूप आवडायचा असं सांगितलं.
आणखी वाचा : Video: …अन् माईकसमोर बोलता बोलता प्राजक्ता गायकवाडला कोसळले रडू, जाणून घ्या कारण
तिचा पहिला सेलिब्रिटी क्रश कोण, याचा खुलासा करताना ती म्हणाली, “मला सलमान खान आवडायचा. मी अगदीच लहान होते…दोन-तीन वर्षांची. माझ्या आतेभावाचा तो खूप आवडता हिरो होता. त्याने मला शिकवलं होतं आणि मी म्हणायचे की मला सलमान खानची लग्न करायचं.” हे उत्तर देताना प्राजक्तालाही ते जुने दिवस आठवून हसू आलं.
तिचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे. तर काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिला आधी वैभव तत्त्ववादी आवडायचा असंही सांगितलं होतं. ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटापासून तो तिचा क्रश होता. पण नंतर त्यांनी एका चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आणि त्यांच्यात मैत्री झाली. आता वैभव तिचा क्रश राहिला नाही असंही तिने सांगितलं होतं.