Prajakta Mali Crush : ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सौंदर्याने आणि निखळ हास्याने प्राजक्ताने लाखो लोकांना भुरळ पाडली आहे. उत्तम अभिनयाबरोबर तिचं सूत्रसंचालन सुद्धा अनेकांना भावतं. ‘पांडू’, ‘पावनखिंड’, ‘तीन अडकून सीताराम’ अशा चित्रपटांमध्ये देखील तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

प्राजक्ता गेल्या काही वर्षांत अभिनेत्री, व्यावसायिका आणि आता अलीकडेच एक उत्तम निर्माती म्हणून उदयास आली आहे. तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत प्रेक्षकांकडून देखील कौतुकाची थाप मिळवली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : “तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”

प्राजक्ता माळीचं नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर

प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असते. आपल्या चाहत्यांबरोबर तिने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेत संवाद साधला. यावेळी अभिनेत्रीला तिच्या एका चाहत्याने, “तुला अभिनेत्री व्हायचं होतं की दुसरं काही?” असा प्रश्न विचारला. यावर प्राजक्ता म्हणाली, “रेशीमगाठी मालिका सुरू होईपर्यंत मला अभिनेत्री व्हायचंय की अजून काही… हे खरंच माहिती नव्हतं. ( मी ट्युबलाइट आहे ) पण, या मालिकेनंतर मला अनेक गोष्टी समजल्या.”

प्राजक्ताला आणखी एका नेटकऱ्याने “मॅम तुमचा क्रश कुणी आहे का” असा प्रश्न विचारला यावर ती म्हणाली, “आधी मला ‘नानी’ आवडायचा. पण आता मला अभिनेता जयम रवी आवडतो. हे दोघंही दाक्षिणात्य अभिनेते आहेत आणि या सगळ्यात रणबीर तर आवडतोच.”

हेही वाचा : नाट्यरंग : सूर्याची पिल्ले; वटवृक्षावरील बांडगुळांची अर्कचित्रात्मक शोकांतिका

Prajakta Mali Crush
प्राजक्ता माळीचा क्रश कोण? ( Prajakta Mali Crush )

हेही वाचा : Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेजेस, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू…

याआधी सुद्धा प्राजक्ताने ( Prajakta Mali ) ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘पटलं तर घ्या’ मुलाखतीत, दाक्षिणात्य कलाकार आवडत असल्याचं सांगितलं होतं. ‘श्याम सिंग रॉय’ चित्रपटामुळे प्राजक्ताला आधी नानी आवडायचा असंही ती म्हणाली होती. दरम्यान, प्राजक्ताच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकताच तिची निर्मिती असलेला ‘फुलवंती’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात तिच्यासह गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत झळकला होता. आता अभिनेत्री पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सूत्रसंचालिकेची जबाबदारी निभावत आहे.

Story img Loader