‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांकडून हा कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची मागणी केली जात होती. आता लवकरच महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर प्रेक्षकांना पुन्हा एकदा हसवण्यासाठी सज्ज होणार आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाची सूत्रसंचालक प्राजक्ता माळीने सेटवरचा खास व्हिडीओ शेअर करत शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती हास्यजत्रेच्या चाहत्यांना दिली आहे.

हेही वाचा : धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या लिपलॉक सीनवर ‘रॉकी और रानी’च्या लेखिकेने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “तो सीन…”

प्राजक्ता माळीने हास्यजत्रेच्या सेटवरील आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सगळे कलाकार मजा करताना दिसत आहेत. याच्या कॅप्शनमध्ये प्राजक्ता लिहिते, “आणि काल शूटिंगला सुरुवात झाली… प्रेक्षकांची आवडती हास्य थेरपी आता १४ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.”

हेही वाचा : “२० ज्येष्ठ रंगकर्मींना प्रत्येकी ७५ हजार…”, अशोक सराफ यांनी सुरु केला नवा उपक्रम; म्हणाले, “माझ्या कुटुंबाकडून…”

प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “आतुरतेने वाट पाहतोय, हास्यजत्रा आणि तुला बघण्यासाठी” अशी कमेंट केली आहे. तर, दुसऱ्या एका युजरने कमेंटमध्ये “कसलंही टेन्शन असूद्या, यातला कोणताही एपिसोड लावला की रिलीफ मिळतो” असे म्हटले आहे.

हेही वाचा : सोनाली कुलकर्णीला ‘या’ सुप्रसिद्ध मराठी गायकावर होता क्रश; अभिनेत्री किस्सा सांगत म्हणाली, “दोघांची नावं सारखी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम १४ ऑगस्टपासून सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या प्रोमोमध्ये दत्तू मोरे, ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौगुले आणि वनिता खरात यांची झलक पाहायला मिळत आहे.