अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. फक्त अभिनयच नाही तर काही महिन्यांपूर्वी तिने स्वतःचा ज्वेलरीचा व्यवसायही सुरू केला. ‘प्राजक्तराज’ असं तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव आहे. तर आता तिच्या या ब्रँडचे दागिने अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी घातले आणि हे दागिने त्यांना कसे वाटले हे त्यांनी सांगितलं आहे.

गणेशोत्सवानिमित्त स्टार प्रवाहने एका खास कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. त्यावेळी स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्व मालिकेतील कलाकार अगदी पारंपारिक वेशभूषेत आले होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री हर्षदा खानविलकरही उपस्थित होत्या. त्यांनी काठापदराची साडी नेसली होती आणि त्यावर ‘प्राजक्तराज’चे पारंपरिक दागिने घातले होते.

why asha bhosle and lata mangeshkar always wore white saree
मी आणि दीदी नेहमी पांढऱ्या साड्या नेसायचो कारण…; आशा भोसलेंनी सांगितली आठवण, म्हणाल्या, “रंगीत साड्या नेसल्या तर…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Ishika Taneja takes diksha left showbiz mahakumbh 2025
प्रसिद्ध अभिनेत्रीने कुंभमेळ्यात घेतली दीक्षा, ३० व्या वर्षी ग्लॅमरविश्व सोडले; म्हणाली, “स्त्रिया लहान कपडे घालून नाचायला…”
shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
संदूक: आव्हानात्मक ‘लायर’
‘पारू’ फेम शरयू सोनावणेने नवऱ्याचं केलं कौतुक, म्हणाली, “तो रोमँटिक नाही पण…”
santosh juvekar reveals his experience to working with vicky kaushal in chhaava
“माझी सुट्टी होती, विकीने अचानक सेटवर बोलावून घेतलं अन्…”, संतोष जुवेकरने सांगितला ‘छावा’च्या सेटवरचा अनुभव, म्हणाला…

आणखी वाचा : “मला सलमान खानशी लग्न करायचंय…” प्राजक्ता माळीचं वक्तव्य चर्चेत; म्हणाली…

या दागिन्यांबद्दल बोलताना त्या एका मुलाखतीत म्हणाल्या, “मी जे दागिने परिधान केले आहेत ते खूप खास आहेत कारण आपला इंडस्ट्रीत काम करणारी अत्यंत सुंदर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या ‘प्राजक्तराज’ या ब्रँडचे हे दागिने आहेत. नुकताच तिने हा नवीन ब्रँड सुरू केला आहे. मी हे दागिने घालण्यासाठी खूप उत्सुक होते, कारण पारंपारिक मराठमोळ्या दागिन्यांचा एक आबच वेगळा असतो. ते दागिने घातल्याशिवाय आपल्याला त्याची ऊर्जा जाणवत नाही. पण असे दागिने परिधान केल्यानंतर आपल्या स्वतःलाच एक मराठमोळा आणि राजेशाही फील येतो. मला आत्ता तसंच वाटत आहे. धन्यवाद ‘प्राजक्तराज’. हे दागिने खूप छान आहेत.”

हेही वाचा : प्राजक्ता माळीने खरेदी केलं नवीन घर, ‘असं’ आहे तिचं ड्रीम होम

फक्त हर्षदा खानविलकरच नाही तर आतापर्यंत अनेक कलाकारांनी प्राजक्ता माळीच्या ‘प्राजक्तराज’ या ब्रँडचे दागिने परिधान केले आहेत.

Story img Loader