मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकर अगदी पुढे आहे. सईने आजवर रुपेरी पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ती फक्त मराठी चित्रपटसृष्टीपर्यंतच मर्यादित राहिली नाही. तर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करत तिथे आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. चित्रपटांमध्ये काम करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या परीक्षकाच्या खुर्चीत सईने स्थान मिळवलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Bigg Boss 16 मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर साजिद खानचं अफेअर? नाव समोर येताच म्हणाली, “मी त्यांच्याकडे…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रत्येक स्किटवर सई योग्य ते मार्गदर्शन करते. शिवाय या कार्यक्रमामधील कलाकारांना शाबासकीची थापही देते. पण हे सगळं सुरू असताना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या पडद्यामागे नेमकी कशी वागते हे प्राजक्ता माळीने सांगितलं आहे. तिच्या वागणूकीबाबाबत तिने भाष्य केलं आहे.

‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ता म्हणाली, “प्रोफेशनल आयुष्य कसं असावं? यासाठी सईकडून मला प्रेरणा मिळते. मी तिचं सतत निरिक्षण करत राहते. प्रतिष्ठित व्यक्तीमत्त्वाप्रमाणेच ती सेटवर वागते. कोणताच पसार नाही, कोणाशीही ती गप्पा गोष्टी करत बसत नाही.”

आणखी वाचा – “गुटखा खाऊन…” लेक वाईट मार्गाला जात आहे कळल्यावर एमसी स्टॅनच्या आई-वडिलांनी घेतला होता ‘तो’ निर्णय, रॅपरचा मोठा खुलासा

“ती तिची खुर्ची कधीच सोडत नाही. सगळेजण तिच्या खुर्चीजवळ तिच्याशी बोलायला जातात. तिथून थेट ती तिच्या व्हॅनिटीमध्ये आणि व्हॅनिटीमधून थेट तिच्या खुर्चीमध्ये सई बसते. नाहीतर आम्ही कशी आहेस? वगैरे वगैरे विचारत फिरतो. हे सगळे गुण मी सईकडून शिकत असते.” प्राजक्ता आता सईकडून कामाच्याबाबतीत अनेक गोष्टी शिकत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta mali talk about how sai tamhankar behave on maharashtrachi hasyajatra set see details kmd