मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीता प्रार्थना बेहेरेचं नाव सामील आहे. तिने तिच्या कामाने सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. ती तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. तर आता तिने तिच्या आयुष्याबद्दलच्या कोणालाही माहीत नसलेल्या अनेक गोष्टी उघड गेल्या आहेत.
प्रार्थना बेहेरेने नुकताच तिचा स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला. तर सध्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी प्रार्थना तिच्या स्वतःच्या या नवीन यूट्यूब चॅनलवरून सर्वांच्या भेटीला येत आहे. या तिच्या चॅनलवर नुकताच तिने एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये तिने तिच्या आयुष्याबद्दलची अनेक गुपितं चाहत्यांशी शेअर केली.
आणखी वाचा : “मी प्रेग्नंट…,” प्रार्थना बेहेरेने केला खुलासा, म्हणाली, “मध्यंतरी एक…”
या व्हिडीओमध्ये प्रार्थना बेहेरेने तिच्या अलिबागच्या घराची झलक दाखवत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी तिला, “तुमचे कुटुंबीय तुमच्याबद्दल सर्वात जास्त कोणत्या गोष्टीबद्दल बोलत असतात?” असा प्रश्न तिला विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, “त्यांना असं वाटतं की माझ्या आणि अभिच्या आवडीनिवडी खूप सारख्या आहेत. आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की आम्हाला मूल नकोय. पण आमच्या घरी जे श्वान आहेत तिच आमची मुलं आहेत. याबद्दल माझे आणि अभिचे विचार खूप सारखे आहेत आणि तेच माझ्या कुटुंबीयांना खूप आवडतं. आम्ही खूप खेळकर कपल आहोत. आम्ही सतत भांडत नसतो तर एकमेकांची मजा मस्करी करत असतो.”
दरम्यान प्रार्थना बेहेरे हिने अभिषेक जावकर याच्याशी २०१७ मध्ये लग्न केलं. अभिषेकही दिग्दर्शक-निर्माता आहे. तर आता नुकतेच ते मुंबई सोडून अलिबागला कायमचे स्थायिक झाले आहेत.