मराठी चित्रपट व मालिका विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वीच प्रार्थनाने मुंबईपासून दूर अलिबागला निसर्गरम्य ठिकाणी तिचं नवीन घर खरेदी केलं होतं. या घराची संपूर्ण झलक तिने तिच्या युट्यूब चॅनेलवर दाखवली होती. नवीन घर खरेदी केल्यावर आता प्रार्थनाने तिच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.

प्रार्थनाने तिच्या नवऱ्याच्या साथीने मुंबईतील अंधेरी परिसरात नवीन ऑफिस घेतलं आहे. प्रार्थना-अभिषेकने आज जोडीने त्यांच्या नवीन ऑफिसची पूजा केली. पारंपरिक पद्धतीने पूजा करुन अभिनेत्रीने नवऱ्याच्या साथीने तिच्या नव्या ऑफिसमध्ये प्रवेश केला.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

हेही वाचा : “बिग बॉसच्या घरातील प्रेम बाहेर येईपर्यंत…”, अमृता देशमुख-प्रसाद जवादेसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाल्या…

प्रार्थनाच्या नव्या ऑफिसचं नाव ‘रेड बुल स्टुडिओ’ असं आहे. तिचा नवरा अभिषेक जावकर दिग्दर्शक-निर्माता असल्याने भविष्यात सिनेसृष्टीतील अनेक प्रोजेक्टवर काम करण्यासाठी दोघांनाही या नव्या ऑफिसची मदत होणार आहे. प्रार्थनाने शेअर केलेला नव्या ऑफिसचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला तिने “फक्त कृतज्ञता…” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : वयात अंतर, घरच्यांचा विरोध अन्…; ‘अशी’ आहे स्नेहल आणि प्रवीण तरडेंची प्रेमकहाणी, सुखी संसाराला झाली १४ वर्षे!

नेटकरी सध्या अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका नेटकऱ्याने प्रार्थनाच्या व्हिडीओवर “नवीन ऑफिसचं उद्घाटन झालं. आता या ऑफिसचा शुभारंभ तुझ्या आणि श्रेयस सरांच्या एखाद्या प्रोजेक्टने कर” अशी कमेंट केली आहे. यावर अभिनेत्रीने “हो नक्की…” असं उत्तर दिलं आहे. दरम्यान, प्रार्थनाच्या चाहत्यांव्यतिरिक्त प्रिया मराठे, दिप्ती देवी, अदिती द्रविड या अभिनेत्रींनी सुद्धा प्रार्थनाला भविष्याच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader