झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतून प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यांनी साकारलेल्या यश आणि नेहाची दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. आता ही मालिका अंतिम टप्प्यात आली आहे. कालच या मालिकेचा शेवटचा भाग शूट झाल्याचं प्रार्थनाने सोशल मीडियावरून सांगितलं. पण आता त्या व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग झालं. या दरम्यानचा एक व्हिडीओ तिने पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये प्रार्थना लाल रंगाच्या साडीमध्ये रस्त्यावर पळत येताना दिसून येत आहे. तसंच ती घाईघाईत कुठेतरी जाण्यासाठी रिक्षाही थांबवतान दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहीलं, “चित्रीकरणाचा शेवटचा दिवस.”

आणखी वाचा : Video: ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण पूर्ण, पोस्ट शेअर करत प्रार्थना म्हणाली…

हेही वाचा : “ज्यांना वाद निर्माण करायची इच्छा असेल त्यांनी…,” नथुराम गोडसेच्या भूमिकेबाबत चिन्मय मांडलेकरचं रोखठोक मत

परंतु तिचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना हसू अनावर झालं आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात झाली. तिच्या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकाऱ्याने लिहीलं, “काय लॉजिक आहे? ज्या दिशेकडून पळत येता त्याच दिशेला जाणाऱ्या रिक्षेला हात करता.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तिनेसुद्धा स्वतःची चप्पल सोडली नाहीच.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “इतकी श्रीमंत आहे तरीही गाडी घेऊन फिरत नाही.” तर एकाने लिहीलं, “हिलची चप्पल घालून इतक्या वेगाने पळतेस! वाह!” तसंच “एकतर ती पडेल नाहीतर साडी सुटेल…” असंही एक नेटकरी म्हणाला. त्यामुळे आता तिचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prarthana behere got trolled because of her video rnv