झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतून प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यांनी साकारलेल्या यश आणि नेहाची दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्या दोघांप्रमाणेच ‘परी’ची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार मायर वायकुळ हिचेही कौतुक झाले. आता ही मालिका अंतिम टप्प्यात आली आहे. कालच या मालिकेचा शेवटचा भाग शूट झाल्याचं प्रार्थनाने सोशल मीडियावरून सांगितलं. यानिमित्त तिने एक खास पोस्ट लिहिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पतीपासून वेगळी राहणारी, स्वतःला एक मुलगी असलेली नेहा आणि उच्चशिक्षित, गडगंच श्रीमंत यश यांची लव्हस्टोरी या मालिकेत दाखवण्यात आली होती. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचा हा हटके विषय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. पण अचानक ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं कळताच या मालिकेचे प्रेक्षक निराश झाले आहेत. अशातच प्रार्थनाने काल या मालिकेच्या शेवटच्या भागचं शूटिंग असल्याचं एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं आहे.

आणखी वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

प्रार्थनाने सोशल मीडियावर सक्रिय राहत या मालिकेबद्दल आतापर्यंत अनेक गोष्टी शेअर केल्या. शूटिंगदरम्यानचे फोटो, काही मजेशीर बिहाईंड द सीन्स व्हिडीओ ती शेअर करायची. आताही चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशीचा एक व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रार्थना लाल रंगाच्या साडीमध्ये रस्त्यावर पळत येताना दिसून येत आहे. तसंच ती घाईघाईत कुठेतरी जाण्यासाठी रिक्षाही थांबवतान दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहीलं, “चित्रीकरणाचा शेवटचा दिवस.”

हेही वाचा : प्रार्थना बेहरे पुन्हा एकदा पडली प्रेमात; फोटो पोस्ट करत म्हणाली…

आता तिच्या या व्हिडीओवर तिचे चाहते कमेंट करत मालिकेतील तिच्या कामाचं कौतुक करत आहेत. त्याचप्रमाणे अनेकांनी “ही मालिका संपवू नका,” असंही कमेंट करत म्हटलं आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prarthana behere shared a video of last day shoot of majhi tuzhi reshimgath rnv