झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे सध्या प्रार्थना बेहेरे चर्चेत आहे. आपल्या कामामधून वेळ काढत सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असते. नुकताच तिने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आपल्याला अभिनेत्री म्हणून परिचयाची असलेल्या प्रार्थनाचा अनोखा अंदाज दिसत आहे.
प्रार्थनाला नुकतीच तिच्या शूटिंगच्या व्याग्र शेड्युलमधून सुट्टी मिळाली होती. त्यामुळे तिच्या घरी संध्याकाळी हातात कॉफीचा मग घेऊन खिडकीतून दिसणारा समुद्र आणि सूर्यास्त पहात फ्रेश मूडमध्ये ती गाणी ऐकत होती. ‘शाम’ हे अत्यंत लोकप्रिय गाणं ऐकता ऐकता तिनेही त्या गाण्यात सूर मिसळले. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं, “सनसेट आणि तू…”
आणखी वाचा : “आता पूर्णविराम देण्याची वेळ आलीये…” म्हणणाऱ्या सुव्रत जोशीचे पत्नी सखी गोखलेने मानले आभार, म्हणाली…
हेही वाचा : प्रार्थना बेहरेला बघताच परीला कोसळले रडू, जाणून घ्या नेमकं काय घडलं
हा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांशी शेअर केला. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना फारच आवडला. या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत त्यांनी तिचं गाणं आवडल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे अनेकांनी “तुझं गाणंही यापुढेही ऐकायला आम्हाला आवडेल” अशाही कमेंट्स केल्या. प्रार्थनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.