झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतून प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यांनी साकारलेल्या यश आणि नेहाची दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्या दोघांप्रमाणेच ‘परी’ची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार मायर वायकुळ हिचेही कौतुक झाले. आज मायराचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त प्रार्थनाने तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
या मालिकेत परारथनाने परीच्या म्हणजेच मायराच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच आवडली. त्याचप्रमाणे पडद्यामागेही त्यांची खूप छान गट्टी जमली होती. प्रार्थनाने अनेकदा तिचे आणि मायराचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्यातला बॉण्डिंगच्या चाहत्यांसमोर आणलं होतं. मायरा प्रार्थनाची अत्यंत लाडकी आहे. आता तिच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थनाने त्यांच्या दोघींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : स्पृहा जोशीचा युट्यूब चॅनेल हॅक, माहिती देत अभिनेत्री म्हणाली, “आता सगळे व्हिडीओ…”
प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओत मायरा सुंदरसा फ्रॉक घालून ऑरेंज ज्यूस पिताना दिसत आहे. तर तिच्या बाजूला प्रार्थना बसली आहे आणि त्या ठिकाणी सुरू असलेलं गाणं खुर्चीत बसल्या बसल्यास त्या एन्जॉय करत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत प्रार्थनाने लिहिलं, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू माझ्यासाठी खूप खास आहेस परी. मला तू मोठी व्हायला नको आहेस. तू आहेस तशीच राहा आणि संपूर्ण जगाला तुझ्याभोवती फिरवत राहा. देवाने आमच्यासाठी पाठवलेली तू सर्वात क्युट स्टार आहेस.” आता त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला असून कमेंट्स करत सर्वजण परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
हेही वाचा : Video: ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण पूर्ण, पोस्ट शेअर करत प्रार्थना म्हणाली…
दरम्यान, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. आज रात्री या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. ही मालिका अचानक बंद होणार असल्याने या मालिकेचे चाहते निराश झालेले दिसत आहेत. प्रार्थनाच्या पोस्ट्सवर कमेंट करत ही मालिका बंद करू नका असं अनेक जण सांगत आहेत.