अलीकडच्या काळात अनेक जुन्या चित्रपटांचे सीक्वेल पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. २००३ मध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत असलेला ‘इश्क विश्क’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये शाहिद आणि अमृता रावची फ्रेश जोडी झळकली होती. अभिनेता तेव्हापासून बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. ‘इश्क विश्क’ या चित्रपटातील प्रत्येक गाणं गाजलं. विशेष म्हणजे “इश्क विश्क प्यार…” हे गाणं आजही प्रत्येकाच्या ओठावर आहे. आता जवळपास २१ वर्षांनी हे गाणं पुन्हा एकदा रिक्रिएट करण्यात आलं आहे.

जुन्या गाण्याला रिक्रिएट करून ‘इश्क विश्क रिबाउंड’ हे नवीन गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये रोहित सराफ, पश्मीना रोशन, जिब्रान खान, नेला ग्रेवाल असे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट २८ जूनला सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे या सीक्वेलबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषत: यामधील ‘इश्क विश्क’ गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या गाण्यावर अनेक सेलिब्रिटींनी डान्स व्हिडीओ बनवले आहेत.

anant ambani and Radhika merchant dance at best friend sangeet ceremony video viral
Video: “अनारकली डिस्को चली…”, मुकेश अंबानींच्या धाकट्या सूनेचा मैत्रिणींसह जबरदस्त डान्स, तर अनंत अंबानी थिरकला ‘या’ गाण्यावर
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
how this old lady used to look at young age
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”
viral video young girl dancing front of buffalo-or cow and see what happens next funny video goes viral
VIDEO: बापरे तरुणीनं हद्दच पार केली, तिचा तो विचित्रपणा पाहून म्हैस ही वैतागली; शेवटी जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Tum Hi Ho song played on Dholki
रडायचं की नाचायचं? ढोलकीच्या तालावर वाजवलेलं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न? पाहा जबरदस्त VIDEO
Aunty dance Hawa Hawa Aye Hawa
“हवा हवा ऐ हवा, खुशबू लुटा दे…” गाण्यावर काकूंनी केला दिलखुलास डान्स, Viral Video पाहून तुम्ही व्हाल खुश, एकदा बघाच
Man dance for wife on 25th anniversary
“जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीच्या प्रेमात…” २५ व्या वाढदिवसानिमित्त ‘त्यांनी’ केला बायकोसाठी जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी फिदा
Grandfather sings song vasant sena for grandmother romantic video viral on social Media
VIDEO: प्रेम असावे तर असे! डोळ्यात अशी माझ्या ठसली मला वसंत शैना दिसली; आजोबांचा रोमँटिक अदांज, आजीसाठी गायलं भन्नाट गाणं

हेही वाचा : Video : राणादा अन् पाठकबाईंना पडली ‘पुष्पा २’च्या ‘सूसेकी’ गाण्याची भुरळ! हार्दिक जोशीच्या नव्या हेअरस्टाइलने वेधलं लक्ष

मराठी कलाविश्वातील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख. हे दोघे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एकत्र सहभागी झाले होते. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात होऊन अमृता-प्रसादने गेल्यावर्षी नोव्हेंबर ( २०२३ ) महिन्यात लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील बरीच कलाकार मंडळी उपस्थित राहिली होती. याशिवाय यांच्या लग्नातील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीने शाहिद कपूरच्या ‘इश्क विश्क’ गाण्यावर नुकताच जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्यावर डान्स करताना या दोघांनी मॅचिंग शेड्सचे कपडे घातले होते. प्रसाद जवादे व अमृता देशमुखचा हा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अवघ्या दोन दिवसांत या दोघांच्या व्हिडीओने १० लाखांचा टप्पा पार केला आहे.

हेही वाचा : Video : “जर तू मेलीस तर मी…”; लेकीच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने क्रांती रेडकरला बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाली, “तीन फुटांची पण नाहीये…”

दरम्यान, प्रसाद-अमृताच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर प्रसाद सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेत आदित्य किर्लोस्कर ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तर, अमृता सध्या रंगभूमीवर काम करत आहे.

Story img Loader