अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे या दोघांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत साखरपुड्याची घोषणा केली होती. प्रसाद-अमृतामध्ये ‘बिग बॉस’च्या घरात घट्ट मैत्री झाल्याचे पाहायला मिळाले होते. २२ जुलैला दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत लग्नाच्या तारखेची घोषणा केली. नुकताच अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांच्या घरचे एकमेकांना कसे भेटले? याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये प्रसाद अमृताच्या घरच्यांसाठी खास पदार्थ बनवताना दिसत आहे.

हेही वाचा : “ओठांची आणि नाकाची सर्जरी…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला बॉलीवूडमधील अनुभव; म्हणाली, “१८ वर्षांच्या मुलीला…”

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Madhurani Prabhulkar
Video : “खंत वाटली…”, मधुराणी प्रभुलकरने कुलाबा किल्ल्याला भेट दिल्यानंतर व्यक्त केल्या भावना; म्हणाली, “कुणी गांभीर्याने…”
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
kumar vishwas sonakshi sinha ramayana
“तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका; म्हणाले, “मुलांना रामायण…”
ek thali ek thaili rss
महाकुंभ २०२५! ‘एक थाळी एक थैली’ आणि ‘ समयदानी ‘ उपक्रम
Video : पॅकअप होताच मृणाल ठाकूरचा आनंद गगनात मावेना, ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘पीलिंग्स’ गाण्यावर रील करत केली धमाल

लग्न जुळवण्यासाठी मुलाकडची सगळी मंडळी मुलीच्या घरी जातात. या परंपरेनुसार प्रसादच्या घरचे सुद्धा अमृताकडे गेले होते. परंतु, प्रसाद-अमृताचा चहा पोह्यांचा कार्यक्रम नेहमीपेक्षा वेगळा आणि हटके झाला. याचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री लिहिते, जेव्हा प्रसाद जवादेचे कुटुंब मला बघायला आले. त्यानंतर मी माझ्या नाजूक हातांनी त्यांना चहा सर्व्ह केला पण, तो चहा मी बनवला नसून प्रसादने बनवला होता. अशाप्रकारे आमच्या चहा-पोह्यांचा हटके कार्यक्रम संपन्न झाला.

हेही वाचा : “१२५ ते १०० किलो…”, ‘बिग बॉस’ फेम पारस छाबराने कसं कमी केलं वजन? शेअर केलेल्या फोटोंची चर्चा

अमृता देशमुख पुढे लिहिते, “चेष्ठा बाजूला ठेवली तर, आमचा हा हटके कार्यक्रम प्रसादच्या कुटुंबीयांनादेखील खूप आवडला. आम्ही सुरु केलेली ही आगळीवेगळी प्रथा येणाऱ्या काळात प्रत्येक होणाऱ्या सूनेसाठी उपयोगी ठरेल.” अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रसाद सर्वांसाठी चहा आणि होणाऱ्या बायकोसाठी कॉपी करताना दिसत आहे.

हेही वाचा : नितीन देसाईंची ‘ही’ स्वप्नं राहिली अपूर्ण; प्रसिद्ध कोरिओग्राफर सुभाष नकाशे यांनी केला खुलासा, म्हणाले “त्यांना…”

दरम्यान, अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओवर अभिनेत्री मेघा घाडगेने “मी तुम्हा दोघांसाठी खुप आनंदी आहे ..! असेच आयुष्यभर आनंदी रहा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला” अशी कमेंट केली आहे. तसेच प्रार्थना बेहरे, त्रिशूल मराठे यांसारख्या अनेक कलाकारांनी या दोघांच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader