‘फ्रेशर्स’, ‘तुमचं आमचं सेम असतं’, ‘मी तुझीच रे’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता देशमुख नेहमी चर्चेत असते. आता अमृता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात अमृता प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. त्यामुळे सध्या ती खूप चर्चेत आली आहे. पण, जेव्हा अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवरा प्रसाद जवादेची प्रतिक्रिया काय होती? जाणून घ्या…
अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचे सूर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात जुळले. या पर्वात दोघांची चांगलीच मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि अखेर दोघं १८ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकले. अमृता आणि प्रसादचं समारंभपूर्वक लग्न पाहायला मिळाले. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. लग्नानंतर दोघं देखील वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आपल्या कामात व्यग्र आहेत. आता अमृताची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात एन्ट्री झाली. याचा आनंद प्रसादला खूप झाला. त्याची प्रतिक्रिया काय होती? याबाबत अमृताने स्वतः सांगितलं.
हेही वाचा – अमृता देशमुखचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर झालं ‘असं’ स्वागत, म्हणाली, “ओंकार राऊतने…”
अमृता देशमुखने नुकताच ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अमृताला प्रसादच्या प्रतिक्रियेबाबत विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “प्रसादला खूपच आनंद झाला. तो वाटच बघत होता मी कधी एकदा हास्यजत्रेमध्ये जातेय आणि परफॉर्म करतेय. नम्रताला तो अगदी जवळची बहीण मानतो. त्याला त्याचाच खूप आनंद होतं होता. नमा आणि तू एका ठिकाणी म्हणत होता. त्यामुळे तो खूप उत्सुक आहे. तो मला खूप प्रोत्साहन देतोय. तुला जमणार, तू करणार, असं नेहमी म्हणतं असतो.”
हेही वाचा – “तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
पुढे अमृता भाऊ अभिषेक देशमुखविषयी म्हणाली, “हास्यजत्रेबाबत अभिषेकबरोबर मेसेजवर बोलणं झालं. पण समोरासमोर बोलणं झालेलं नाही. पण, अभिषेक, कृतिकाला खूप आवडणार आहे, याच्यावर माझा विश्वास आहे.”
हेही वाचा – “मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
दरम्यान, अमृता देशमुख कामाव्यतिरिक्त वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे. नेहमी नवरा प्रसाद जवादेबरोबर रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसंच तिच्या ‘नियम व एटी लागू’ या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकात अमृतासह अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, प्रसाद बर्वे आहेत. याच नाटकासाठी अमृताला ‘झी नाट्य गौरव’चा सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.