अभिनेता प्रसाद जवादे याने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता सध्या तो ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. या शोमुळे तो चांगलाच चर्चेत आहे. पण अभिनेता होणं हे त्याचं स्वप्न कधीच नव्हतं असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसाद जवादे याने ‘राजश्री मराठी’ला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याला “तुझ्याबद्दल कोणालाच माहित नसलेल्या गोष्टी सांग,” असं विचारण्यात आलं. त्याचे त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. अशातच त्याने त्याच्या मृत्यूचा उल्लेख करत एक गोष्ट सांगितली.

आणखी वाचा : प्रार्थना बेहरेला बघताच परीला कोसळले रडू, जाणून घ्या नेमकं काय घडलं

हेही वाचा : Bigg Boss Marathi 4: तेजस्विनी लोणारीने स्पष्ट केले लग्न न करण्याचे कारण, म्हणाली, “आपल्या इंडस्ट्रीत…”

प्रसाद म्हणाला, “मला सुरुवातीपासूनच नौदलात जायचं होतं. त्यासाठी मी अनेक वर्ष तयारी केली. त्याच्या सगळ्या प्रार्थमिक परीक्षा मी उत्तीर्ण झालो. तसंच त्याचं काही महीने ट्रेनिंगही घेतलं. पण माझ्या आईला एका गुरुजींनी असं सांगितलं होतं की माझा मृत्यू पाण्यात होईल, त्यामुळे मी नैदलात न जाता दुसरं काहीतरी करावं अशी तिची इच्छा होती. त्यामुळे मी ते सोडलं आणि अभिनय क्षेत्रात आलो.” प्रसादच्या या बोलण्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्याचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasad jawade shared his dream to become naval officer rnv