मराठी मनोंरजसृष्टीतील लोकप्रिय जोडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे काल (१८ नोव्हेंबरला) लग्नबंधनात अडकले. जवळचे नातेवाईक आणि मराठी कलाकारांच्या उपस्थितीत थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. लग्नात प्रसाद आणि अमृताच्या लूकची चांगलीच चर्चा झाली. या दरम्यान आणखी एका गोष्टी चर्चा रंगली ते प्रसादच्या गळ्यातील लॉकेटची.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- टीम इंडियाच्या विजयासाठी प्राजक्ता माळीचे गणपती बाप्पाला साकडं, म्हणाली “आजची मॅच…”

प्रसाद आणि अमृताने लग्नादरम्यान पारंपारिक लूक परिधान केला होता. अमृताने गुलाबी रंगाची साडी, तर प्रसादने पिवळ्या रंगाचं पितांबर नेसल्याचं बघायला मिळालं होतं. दोघांच्या या लूकने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं. दोघांच्या या साधेपणाचं अनेकांनी कौतुक केलं. लग्नादरम्यान प्रसादचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये प्रसादने अमृताच्या नावाचं लॉकेट घातल्याच दिसत आहे. प्रसादच्या या लॉकेटची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात प्रसाद आणि अमृता सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे जाऊन या मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. जुलै महिन्यात प्रसाद आणि अमृताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबूली दिली होती. काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी साखरपुडा करत सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला होता. प्रसाद अमृताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अमृताचे ‘नियम व अटी लागू’ नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. तर प्रसाद जवादे शेवटचा काव्यांजली मालिकेत झळकला होता.