‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला विनोदवीर म्हणजे प्रसाद खांडेकर. या कार्यक्रमाने त्याला नवी ओळख दिली. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांशी संपर्कात असतो. आता नुकतीच त्याच्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक पोस्ट लिहिली, जी आता चर्चेत आली आहे.
प्रसाद नेहमीच सोशल मीडियावरून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असतो. कालच त्याच्या बायकोचा वाढदिवस झाला. यावेळी त्यांनी तिला खास पोस्ट लिहित शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्याने तिला एक मोठं वचनही दिलं.
आणखी वाचा : प्रसाद ओक व सई ताम्हणकरला हात जोडून मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय?
प्रसादने त्याचा पत्नीबरोबरचा एक फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, “हॅप्पी बर्थडे माय डियर बायको अल्पा…अशीच हसत राहा, अशीच ओरडत राहा, अशीच प्रेम करत राहा, आणि सर्वात महत्वाचं, अशीच कायम खुश राहा, मला माहित्येय तुला गिफ्ट म्हणून माझा वेळ हवाय आणि तो मी येत्या वर्षात खुप देईन आय प्रॉमिस आणि श्लोक सोबतच तुझा “sweet memories”चा केक बिझनेससुद्धा मोठा होतोय हे बघून भारी वाटतय …आय लव्ह यू डार्लिंग! माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर…. तुला जे जे हवं ते सगळं मिळो हीच बाप्पा चरणी प्रार्थना.”
प्रसादची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या फोटोंवर कमेंट करत मनोरंजन सृष्टीतील त्याची मित्रमंडळी त्याचप्रमाणे त्याचे चाहते त्याच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याचबरोबर त्यांच्यातलं बॉण्डिंग आवडल्याचंही त्याचे चाहते कमेंट्स करत सांगत आहेत.