Prasad Oak and Manjiri Oak Video : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे प्रसाद ओक व मंजिरी ओक ही जोडी. सध्या ही जोडी त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच प्रसाद व मंजिरीचा एक मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. अभिनेत्याने बायकोची माफी मागत हा व्हिडीओ शेअर केला होता. दोघांच्या या मजेशीर व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अशातच प्रसाद व मंजिरीचा आणखीन एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

“कुणीतरी म्हणून ठेवलंय ‘हेच जीवन आहे'”, असं कॅप्शन देत मंजिरी ओकने मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. दोघांनी हा व्हिडीओ रिक्रिएट केला आहे. ज्यामध्ये प्रसाद ( Prasad Oak ) मंजिरीला बोलताना दिसत आहे की, खुद को कभी बेकार मत समझो, माना तुम हो…मत समजो. हे ऐकून मंजिरी नाराज होते. दोघांच्या या मजेशीर व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”

हेही वाचा – Bigg Boss Marathi : “वर्षाताई एक नंबर…”, वर्षा उसगांवकरांच्या ‘या’ निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, नेमकं काय घडलंय? वाचा

अभिनेत्री अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी, सोनाली नाईक यांच्यासह अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अवघड आहे”, “ताईंचा घोर अपमान आहे हा”, “चहाचा घोट तोंडात आणि खुदकन नाकातून आला राव…”, “प्रसाद सर ( Prasad Oak ), जेवून झोपलात का उपाशी पोटी झोपलात?”, “सर भीती नाही का वाटत हो”, “बापरे काय डेंजर आहात सर तुम्ही”, “खतरनाक”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – अनंत अंबानी-राधिका मर्चंटने हनिमूनसाठी निवडलं पॅरिसमधील ‘हे’ रिसॉर्ट, किंमत वाचून व्हाल हैराण

Prasad Oak and Manjiri Oak Video Comments

प्रसाद ओकचे आगामी चित्रपट जाणून घ्या…

दरम्यान, प्रसाद ओकच्या ( Prasad Oak ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्याच्या ‘धर्मवीर-२’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे. २७ सप्टेंबरला ‘धर्मवीर-२’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ९ ऑगस्ट होती. पण काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. ‘धर्मवारी-२’ चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. याव्यतिरिक्त प्रसाद ओक ‘वडापाव’, ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘महापरिनिर्वाण’ , ‘रीलस्टार’ या आगामी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Story img Loader