‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. यामधील सगळे विनोदवीर महाराष्ट्राच्या जनतेला खळखळून हसवतात. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला १४ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली आहे. हास्यजत्रेमुळे अनेक कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली. या कार्यक्रमात अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर परीक्षकांची धुरा सांभाळतात. प्रसाद ओकने नुकताच हास्यजत्रेच्या सेटवरील सईबरोबरचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “ते बालगुन्हेगार ढसाढसा रडले…”, दिग्पाल लांजेकरांनी सांगितला शिवराज अष्टक मालिकेचा अनुभव; म्हणाले, “त्या मुलांनी गुन्हेगारी…”

प्रसादने हास्यजत्रेच्या सेटवरील मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. दोघेही यावेळी सेटवर परीक्षकाची जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये अभिनेता म्हणतो, “नमस्कार! मी हास्यजत्रेच्या सेटवरुन तुम्हा सगळ्यांशी बोलत आहे आणि इथे हास्यजत्रेच्या सेटवर माझ्या शेजारी नक्की काय चाललंय हे मला कळत नाहीये… तुम्हाला कळालं तर तुम्ही मला समजावून सांगा.” असे सांगून प्रसाद सईकडे कॅमेरा फिरवतो.

हेही वाचा : “हल्क, सुपरमॅनसारख्या फेक सुपरहिरोंची चित्रं…”, ‘सुभेदार’च्या कलाकारांना तरुणाने भेट दिले टी-शर्ट, चिन्मय मांडलेकर म्हणाला…

प्रसादने सईकडे कॅमेरा फिरवल्यावर अभिनेत्री म्हणते, “आमचे महाबळेश्वर काका आहेत त्यांच्याकडून मी शुभेच्छा घेत होते.” हे सांगत असताना सई हातात लाडका दादूस अर्थात अरुण कदम यांचा फोटो दाखवते. नेटकऱ्यांनी या दोघांच्या मजेशीर व्हिडीओवर कमेंट करत “अरुण कदम महाबळेश्वरचे आहेत का? पुढच्या स्किटमध्ये महाबळेश्वरचा उल्लेख असेल का?” असे प्रश्न विचारले आहेत.

हेही वाचा : ‘गदर २’मधील ‘तो’ सीन पाहून कार्तिक आर्यनने चित्रपटगृहात केला जल्लोष! व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तारा सिंगचा चाहता…”

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील पृथ्वीक प्रताप, अरुण कदम, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, समीर चौघुले, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, शिवाली परब हे विनोदवीर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण सोनी मराठी वाहिनीवर केले जाते.