अभिनेते प्रशांत दामले हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. प्रशांत दामले यांनी रविवारी (६ नोव्हेंबर) त्यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग सादर केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. या कार्यक्रमात सत्कार झाल्यानंतर विक्रमादित्य प्रशांत दामले यांनी त्याचं मनोगत व्यक्त केलं. या मनोगतामध्ये प्रशांत दामले यांनी त्यांच्या कारकिर्दीबरोबरच विविध गोष्टींवर भाष्य केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रशांत दामले यांनी त्यांच्या कारकिर्दीमधील १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग रविवारी ६ नोव्हेंबर रोजी षण्मुखानंद सभागृहात सादर करण्यात आला होता. त्याच्या या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर प्रशांत दामले यांचा पत्नीसह सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याच्या अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. हा सत्कार झाल्यानंतर विक्रमादित्य प्रशांत दामले यांनी त्याचं मनोगत व्यक्त केलं. प्रशांत दामले यांनी या कार्यक्रमात त्यांच्या नाटकाची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगितले. तसेच त्यांना नाट्यसृष्टीत कसे अनुभव आले याबद्दलही त्यांनी जाहीरपणे मत मांडले.
आणखी वाचा : “मुलगी होण्यापेक्षा…” आलिया भट्टच्या पोस्टनंतर अक्षय कुमारचा रणबीर कपूरला सल्ला

प्रशांत दामले यांनी यावेळी गेल्या ३९ वर्षात माझे कोणाशीही भांडण झाले नाही, याबद्दलचा किस्सा सांगितला. प्रशांत दामले हे जग्नमित्र आहेत याबद्दल सर्वांनाच कल्पना आहे. यावेळी ते म्हणाले, “हे तर सर्वश्रुत आहे. गेल्या ३९ वर्षांपासून मी इथं काम करत आहे. पण आतापर्यंत माझं कुणाशीही भांडण झालेलं नाही. माझा इथं कुणीही वैरी नाही.”

“जेव्हा मला एखाद्या व्यक्तीशी पटणार नाही हे कळतं तेव्हा मी हळूच काढता पाय घेतो. पण त्याच्याबरोबर वाद, भांडण करत नाही. कारण हे जग छोटं आहे. आज ना उद्या त्या व्यक्तीशी आपली गाठभेट होणार आहे. त्याच्याबरोबर कधीतरी काम करावे लागणार आहे. त्यामुळे अशावेळी कडवटपणा कशासाठी घ्यायचा?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.

आणखी वाचा : “मी मनाने तिथेच…” प्रशांत दामलेंच्या विक्रमी नाट्यप्रयोगला बिग बींनी मराठीत दिल्या शुभेच्छा

दरम्यान ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचा हा प्रयोग सायनमधील श्री ष्णमुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे संपन्न झाला. या नाटकाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र काम करत आहे. त्यांनी नाटकांसह काही चित्रपटांमध्येही काम केले होते. या दोघांव्यतिरिक्त या नाटकामध्ये अतुल तोडणकर, प्रतीक्षा शिवणकर, मृणाल चेंबूरकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे हे कलाकार काम करत आहेत. अद्वैत दादरकरने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant damle talk about i have not had a fight with anyone in the last 39 years share experience nrp