आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’नंतर ही जमलेली जोडी आता श्रोत्यांची लाडकी जोडी झाली आहे. दोघांच्या कामाचं नेहमीच कौतुक होतं असतं. मुग्धा व प्रथमेश नेहमी चर्चेत असतात. दोघंही आपल्या चाहत्यांबरोबर दैनंदिन जीवनातील गोष्ट शेअर करत असतात. अशातच मुग्धाने शेअर केलेल्या एका पोस्टवर युजरने तिला ‘काकू’ म्हटलं आहे; ज्याला प्रथमेशने चोख उत्तर दिलं आहे. तसंच मुग्धानेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी मुग्धा व प्रथमेशने लग्नाला ३ महिने पूर्ण झाल्यानिमित्ताने देवदर्शन केलं. दोघांनी गोव्यातल्या केरीला जाऊन विजयादुर्गा देवीचं आणि माणगावातील श्री दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचं, श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. यासंबंधित मुग्धाने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. तिचे व प्रथमेशचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये मुग्धा निळ्या रंगाच्या साडीत, तर प्रथमेश फिकट हिरव्या रंगाच्या शॉर्ट कुर्तामध्ये दिसला. याच पोस्टवर काही युजरने मुग्धाला ‘काकू’ असं म्हटलं आहे.

हेही वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचकुलेंना मिळाली डॉक्टरेट पदवी! म्हणाले, “माझं योगदान…”

एक युजर म्हणाली, “काकू झाली आहे. टिपिकल बाई.” त्यावर मुग्धा म्हणाली, “स्तुती केल्याबद्दल धन्यवाद आजी.” तर प्रथमेश म्हणाला, “आमच्या कोकणात एक म्हण आहे, ‘माकड म्हणतं आपली लाल..’ असंच सांगितलं…बाकी मनात काही नाही आजी.”

तसेच दुसऱ्या युजरने देखील “काय म्हणता काकू,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर गायिका म्हणाली, “मी एकदम मस्त अण्णा आजोबा.” मुग्धा व प्रथमेशने युजर्सना दिलेल्या या चोख उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – अवघ्या आठ महिन्यांत ‘ही’ लोकप्रिय मालिका झाली ऑफ एअर, आज प्रसारित झाला शेवटचा भाग

दरम्यान, गेल्यावर्षी २१ डिसेंबरला मुग्धा व प्रथमेश लग्नबंधनात अडकले. दोघांचं मोठ्या थाटामाटात, पारंपरिक पद्धतीने लग्न झालं होतं. लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prathamesh laghate gave a reply to the user who called mugdha vaishampayan aunt pps