Prathamesh Laghate Ukadiche Modak : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे प्रथमेश लघाटे घराघरांत लोकप्रिय झाला. गायकाने वैयक्तिक आयुष्यात गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मुग्धा वैशंपायनशी लग्नगाठ बांधली. एकत्र गाण्यांचे शो करताना मुग्धा-प्रथमेशमध्ये चांगली मैत्री झाली. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन या जोडीने खऱ्या आयुष्यात एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मुग्धा-प्रथमेशचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या दोघांच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील बरीच मंडळी उपस्थित राहिली होती. नुकताच मुग्धा-प्रथमेशने लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव कोकणात साजरा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथमेशचं घर रत्नागिरीमध्ये आरवली येथे आहे. गाण्यांचे विविध शो आणि शूटिंग या सगळ्या व्यग्र वेळपत्रकातून वेळ काढत मुग्धा-प्रथमेश गणपतीच्या सणाला गावी गेले होते. यावेळी दोघांनी मिळून जोडीने बाप्पाचा आशीर्वाद घेतला. काही दिवसांपूर्वीच मुग्धाने सासरच्या बाप्पाची झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली होती. याशिवाय मुग्धाचा उकडीचे बनवतानाचा व्हिडीओ देखील सर्वत्र चर्चेत आला होता. आता बायको पाठोपाठ प्रथमेश लघाटेने देखील उकडीचे मोदक बनवले आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “दम असेल तर…”, निक्की संग्रामला थेट म्हणाली ‘फुस्की बॉम्ब’! दोघांमध्ये जोरदार भांडण, पाहा प्रोमो

प्रथमेशने बनवले उकडीचे मोदक

प्रथमेशने उकडीचे मोदक बनवतानाचा व्हिडीओ नुकताच त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. “मोदक बनवण्याची परंपरा…” असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. अतिशय सुबक पद्धतीने प्रथमेश मोदकाला आकार देत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याचं शूटिंग मुग्धाने केलं आहे.

प्रथमेशला मोदक बनवताना पाहून नेटकऱ्यांसह या जोडप्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गायक दरवर्षी आवर्जून मोदक बनवतो. त्यामुळे प्रथमेश व्हिडीओ केव्हा शेअर करणार याची अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते. सुकन्या मोने यांनी या व्हिडीओवर “वाटच बघत होते तुझ्या मोदकांची…मस्तच” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा : “प्रिय आदेश भावोजी…”, पोस्टमन काकांनी वाचलं खास पत्र! सगळेच झाले भावुक; ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाने २० वर्षांनंतर घेतला निरोप

प्रथमेशच्या व्हिडीओवर सुकन्या मोने यांची कमेंट ( Prathamesh Laghate )

सुकन्या मोने यांच्याप्रमाणे प्रथमेशच्या ( Prathamesh Laghate ) या व्हिडीओवर “एक मोदक दुसरा मोदक बनवताना”, “या जोडीने संस्कार चांगल्याने रितीने जपले आहेत…असाच संसार करा”, “आधी मुग्धाने मोदक बनवले…आम्ही तेव्हापासून वाट बघत होतो प्रथमेश केव्हा बनवणार मोदक?”, “तुम्ही दोघे खूप उत्तम उदाहरण ठेवत आहात सगळ्यांसमोर” अशा असंख्य प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी गायकाला मोदक बनवताना पाहून दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prathamesh laghate makes ukadiche modak shares video sukanya mone comments grabs attention sva 00