मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांची जोडी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांसमोर प्रेमाची कबुली दिली होती. यानंतर नोव्हेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा पार पडला होता. आता लवकरच मुग्धा-प्रथमेश लग्नबंधनात अडकणार आहेत.

मुग्धा वैशंपायनच्या घरी नुकताच व्याहीभोजनाचा कार्यक्रम पार पडला. या दरम्यानचे खास फोटो गायिकेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या खास प्रसंगी प्रथमेशने जांभळ्या रंगाचा कुर्ता व मुग्धाने लाल रंगाची धूपछाव साडी नेसली होती. याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत गायिकेने याला “व्याहीभोजन!…” असं कॅप्शन दिलं आहे.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

हेही वाचा : फोटो काढण्यासाठी चाहत्याने मलायका अरोराच्या कंबरेवर हात ठेवला अन्…, अभिनेत्रीच्या बॉडीगार्डची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

मुग्धा-प्रथमेशच्या या व्याहीभोजनाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यातील एका नेटकऱ्याने या दोघांच्या फोटोवर, “मस्त जोडी आहे फक्त प्रथमेशला बोला जरा रोमँटिक असल्यासारखा दिस…सत्यनारायणाच्या पूजेला आल्यासारखा उभा राहू नको बाकी छान” असं लिहिलं होतं.

हेही वाचा : “मी त्याला…”, विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या रायच्या अफेअरबद्दल कळाल्यावर ‘अशी’ होती वडील सुरेश ओबेरॉय यांची प्रतिक्रिया

प्रथमेशने या नेटकऱ्यांनी स्पष्ट शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. तो लिहितो, “अण्णा…व्याहीभोजन ही परंपरा आहे आणि परंपरेसारख्या गोष्टीत कुठे रोमान्स घुसवत आहात राव? खूप गोंधळ झालाय तुमचा.”

Mugdha
मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे

दरम्यान, हे व्याहीभोजनाचे फोटो पाहून अभिनेत्री स्पृहा जोशीने लव्ह इमोजी कमेंट करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मुग्धा-प्रथमेशची पहिली भेट ‘लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर झाली होची. या शोनंतर त्यांचे गाण्याचे अनेक कार्यक्रम व्हायचे. पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता लवकरच दोघेही लग्न करणार आहेत.

Story img Loader