‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे प्रथमेश लघाटे घराघरांत लोकप्रिय झाला. पुढे, शिक्षण पूर्ण करत त्याने आपली गायनाची आवड कायम जोपासली. प्रखमेश मूळचा रत्नागिरीचा. त्यामुळे त्याच्या घरी आंबा व कोकणी उत्पादनांचा व्यवसाय केला जातो. यंदाही गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या व्यवसायाला तो पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे. यासंदर्भात नुकतीच एक खास पोस्ट शेअर करून त्याने माहिती दिली आहे.

प्रथमेशच्या पोस्टवर त्याच्या असंख्य चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र, काही ट्रोलर्सनी गायकाच्या पोस्टवर नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. प्रथमेशचा आंबे विक्रीचा पूर्वापार चालत असलेला व्यवसाय आहे. या पोस्टवर एका नेटकऱ्याने “आम्ही (आंबे) शेतकऱ्यांकडून घेऊ, तुमच्याकडून कधीच नाही” अशी कमेंट केली होती. यावर प्रथमेशने स्पष्ट शब्दांत उत्तर देत आपली बाजू मांडली आहे.

हेही वाचा : ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्री ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकली! नवऱ्याने दिलं सरप्राइज, व्हिडीओ व्हायरल

नेटकऱ्याच्या कमेंटवर “कुठूनही घ्या हो..पण आंबा खा आणि थंड व्हा.” असं हलकफुलकं उत्तर सुरुवातीवा प्रथमेशने दिलं होतं. परंतु, त्यानंतर संबंधित युजरने पुन्हा एकदा “कुठूनही नाही शेतकऱ्यांकडून, त्यामुळेच तुमच्याकडून नाही” असं प्रतिउत्तर गायकाला दिलं. यावर गप्प न बसता प्रथमेशनी भलीमोठी कमेंट करत आपली बाजू मांडली.

हेही वाचा : “संध्याकाळची मालिका दुपारी पाहिली जाईल का?”, ‘आई कुठे काय करते’च्या नव्या वेळेबद्दल मिलिंद गवळींची पोस्ट; म्हणाले…

“कुठूनही म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्याकडून.. simple..माझी भाषा तुम्हाला समजायला खूपच अवघड जातेय असं दिसतंय.. तुमचं नाव तर विवेक दिसतंय पण, प्रत्यक्षात सद् सद् विवेक मात्र आजारी आहे. त्यात स्वतःची खरी ओळख लपवावी लागते insta वर.. followers ही 0…त्यामुळे नकाच घेऊ तुम्ही आमच्याकडून आंबे.. कारण स्वतःची ओळख लपवणाऱ्यांनी एखाद्या बरी ओळख असणाऱ्याकडून आंबे घेणं शोभत नाही आण्णा..स्वतःहूनच स्वतःला ग्रेट म्हणण्यापेक्षा आंबे विकलेले बरे.. आणि एवढं इनकम असूनही follower शून्यच??” असं उत्तर देत फेक आयडीवरून कमेंट करणाऱ्या युजरची प्रथमेशने चांगलीच शाळा घेतली.

हेही वाचा : मराठमोळ्या श्वेता शिंदेचं शाहिद कपूर, विवेक ओबेरॉय अन् करीनाबरोबर आहे खास कनेक्शन; म्हणाली, “हे कलाकार तेव्हा…

prathamesh laghate
प्रथमेश लघाटे कमेंट्स

दरम्यान, प्रथमेशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मुग्धा वैशंपायनबरोबर लग्नगाठ बांधत त्याने नव्या आयुष्याला सुरुवात केली. हे दोघेही सध्या सुखी संसारात रमले आहेत.

Story img Loader