प्रथमेश लघाटे हा आजच्या तरुण पिढीतील आघाडीच्या गायकांपैकी एक आहे. त्याच्या गाण्याचं नेहमीच कौतुक होत असतं. पण सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच एक फोटो शेअर करत तो मुग्ध वैशंपायनला डेट करत असल्याचा खुलासा त्याने केला. तर आता तो तिच्या आईला कोणत्या नावाने हाक मारतो हे समोर आलं आहे.
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वामध्ये प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. तेव्हापासूनच त्यांची चांगली मैत्री आहे. या कार्यक्रमामुळेच त्या दोघांचे कुटुंबीयही गेली अनेक वर्षं एकमेकांना ओळखतात. आता प्रथमेश-मुग्धाने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांचे आई-वडीलही खूप खुश आहेत.
आणखी वाचा : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती? दोघांची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क
कालच मुग्धाच्या आईचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने मुग्धाने एक खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तर त्यांचा होणारा जावई म्हणजेच प्रथमेश लघाटे यानेदेखील मुग्धाच्या आईबरोबरचा एक फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने लिहिलं, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी!!” तर आता यानिमित्ताने तो मुग्धाच्या आईला मावशी अशी हाक मारतो हे त्याच्या चाहत्यांना कळलं आहे.
हेही वाचा : काय सांगता! स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटे आहेत एकमेकांचे नातेवाईक, जाणून घ्या काय आहे दोघांच्यात नातं?
दरम्यान, मुग्धा आणि प्रथमेशच्या नात्याबद्दल कळताच त्यांचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. आता हे दोघं कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.