Prathamesh Parab and Kshitija Ghosalkar Wedding : प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांचा विवाहसोहळा येत्या २४ फेब्रुवारीला पार पडणार आहे. सध्या अभिनेत्याच्या घरी लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्रथमेश-क्षितिजाचा साखरपुडा पार पडला होता. त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या दोघांच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. क्षितिजाने त्यांच्या मेहंदी सोहळ्याची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
क्षितिजा घोसाळकरच्या घरी मेहंदी सोहळ्याला सुरुवात झाल्याचं ‘प्रतिजा’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं आहे. या समारंभाला हिरव्या रंगाचा खणाचा ड्रेस, ‘प्रथमेशची पराजू’ असं हटके नाव लिहिलेले कानातले असा खास लूक क्षितिजाने केला होता. यावेळी तिच्या हातावरच्या आकर्षक मेहंदीने विशेष लक्ष वेधून घेतलं.
हेही वाचा : शुभमंगल सावधान! रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात; गोव्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नसोहळ्यासाठी ‘प्रतिजा’ (#Pratija) हा खास हॅशटॅग तयार करण्यात आला आहे. या हॅशटॅगची झलक मेहंदी सोहळ्यात क्षितिजाच्या सुंदर अशा ड्रेसवर पाहायला मिळाली. लाडक्या बायकोला मेहंदी काढत असताना प्रथमेशने खास व्हिडीओ कॉल केला होता. या व्हिडीओवर सध्या नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
हेही वाचा : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘या’ चित्रपटाने मारली बाजी! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी…
दरम्यान, प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. पुढे हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अभिनेत्याने पहिल्यांदा १४ फेब्रुवारी २०२० रोजी व्हेलेंटाईन डेची फोटोशूट सीरिज पाहून क्षितिजाला मेसेज केला होता. आता येत्या २४ फेब्रुवारीला ही जोडी लग्नंबधनात अडकणार आहे.