मालिका विश्वामधील सुप्रसिद्ध जोडी म्हणजे गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी. या सेलिब्रिटी कपलला आजवर प्रेक्षकांनी, चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. या दोघांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर गुरमीत-देबिनाने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. सहा महिन्यांपूर्वीच देबिनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर देबिनाने पुन्हा एकदा गुड न्यूज देत आपण गरोदर असल्याचं सोशल मीडियाद्वारे सांगितलं. प्रेग्नेंसीदरम्यानचा तिचा एक बोल्ड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – बेबी बंप फ्लॉन्ट करत बिपाशा बासूने केलं आजवरचं सगळ्यात बोल्ड फोटोशूट, गरोदरपणातील ‘तो’ लूक व्हायरल
देबिनाला दुसऱ्या प्रेग्नेंसीदरम्यानही फोटोशूट करण्याचा मोह काही आवरला नाही. तिने फोटोशूट करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे ती सध्या ट्रोल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
देबिनाने या फोटोशूटदरम्यान ट्रान्सपरंट पँट, पांढऱ्या रंगाचं शर्ट तिने परिधान केलं आहे. तसेच हाय हिल्स घालून तिने हे फोटोशूट केलं. यामध्ये ती बेबी बंपही फ्लॉन्ट करताना दिसत आहे. पण तिचा हा लूक नेटकऱ्यांच्या काही पसंतीस पडला नाही.
आणखी वाचा – अतिउत्साहीपणा नडला; तोल गेला अन् नदीत पडली कंगना रणौत, स्वतःच फोटो शेअर करत म्हणाली…
असं फोटोशूट करण्याची काय गरज होती, बेबी बंप दाखवण्याची गरज काय?, असं फोटोशूट असतं का? अशा अनेक कमेंट तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केल्या आहेत. देबिना या व्हिडीओमध्ये अगदी हॉट दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला काही तासांमध्येच हजारो व्ह्युज मिळाले आहेत.