मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानची नवीकोरी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ कालपासून सुरू झाली आहे. बऱ्याच काळानंतर तेजश्रीने मालिकाविश्वात पुनरागमन केल्यामुळे या नव्या मालिकेची जोरदार चर्चा रंगली होती. तेजश्री चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर कालपासून मालिकेला सुरू झाली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये तेजश्रीने मुक्ता ही भूमिका साकारली आहे. पण तिला मालिकेतील एका अभिनेत्रीने एक भन्नाट नाव दिलं आहे. याचा खुलासा तेजश्रीनं स्वतः केला आहे.
हेही वाचा – ‘रमा राघव’ या मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट; व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विरोधी स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात? दोघांमधील प्रेम कसं बहरत? हे पाहायला मिळणार आहे. मुक्ताची भूमिका तेजश्रीने तर सागरची भूमिका राज हंचनाळेने साकारली आहे. तसेच या मालिकेत शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर, संजीवनी जाधव असे तगडे कलाकार मंडळी आहेत.
इंद्रा म्हणजे सागरच्या आईने तेजश्रीला एक भन्नाट नाव दिलं आहे. इंद्रा ही भूमिका संजीवनी जाधव यांनी साकारली आहे. तेजश्रीचं हे भन्नाट नाव म्हणजे ‘कडीपत्याची काढी.’ यासंबंधिचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्रामवर पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा – अभिनेत्री मीरा जोशी झळकणार ‘या’ लोकप्रिय मालिकेत; शरद पोंक्षेंबरोबर करणार काम
या व्हिडीओत तेजश्री म्हणते की, “या मालिकेत दोन फार महत्त्वाचे खांब आहे. एक म्हणजे माझी आई आणि दुसरी म्हणजे सागरची आई. या दोघींची भांडण, त्यांचा ट्रॅक किंवा ही जोडी एक वेगळ्या पातळीवर लोकप्रिय होईल, असं मला वाटतं. याच्या पलीकडे जाऊन खरंतर ट्रोल होणं ही गोष्ट आम्हाला आवडत नाही. पण आता आपण अशा एका अभिनेत्रीला भेटूया, ज्यांनी माझ्यासाठी म्हणजे मुक्तासाठी वापरलेल्या नावामुळे ती ट्रोल होऊ शकते. आता आपण त्यांना विचारून या, तो शब्द कुठला आहे. कारण काही काळाने मला महाराष्ट्र त्याच नावाने बोलवू लागेल, अशी एक मला भीती वाटतेय.”
त्यानंतर तेजश्री संजीवनी जाधव यांना त्या नावाबद्दल विचारते. तेव्हा त्या म्हणतात की, “मी हिला कडीपत्त्याची काढी असं म्हणते. कुठलंही भांडण झालं आणि ही मधे आली तर मी हिला ‘कडीपत्त्याची काढी आयली’, असं म्हणते. मला हे नाव खूप आवडतं. कारण ती खूप छान, बारीक आहे.”
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम लाडक्या दादूसने ‘या’ फोटो मागची सांगितली गोष्ट; म्हणाला, “हा फोन….”
हेही वाचा – “अबाया परिधान केल्याने कोणी मुस्लिम होत नाही…” गौहर खानने नाव न घेता राखी सावंतवर केली टीका, म्हणाली…
दरम्यान, तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने यापूर्वी ‘होणार सून मी ह्या घरची’ ‘अग्गंबाई सासूबाई’ यांसारख्या लोकप्रिय मालिकेत काम केलं आहे. तसेच तिचे बरेच चित्रपटही चांगलेच गाजले आहेत.