अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक ज्या क्षणांची वाट पाहत होते, तो क्षण मालिकेत येऊन ठेपला आहे. लवकरच मुक्ता-सागर लग्नबंधनात अडकणार असून यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
सध्या मालिकेत मुक्ता-सागरच्या लग्नाची लगबग सुरू आहे. गोखले-कोळी कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. मुक्ता-सागरचं लग्न गोखले कुटुंबीयांच्या रितीरिवाजानुसार होणार आहे. साखरपुडा, मेहंदी, हळद, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पार पडणार आहे. मुक्ताची आई म्हणजेच अभिनेत्री शुभांगी गोखले दोन्ही हातावर स्वतःचं मेहंदी काढताना दिसल्या. हे पाहून मुक्ता म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने त्यांचं कौतुक केलं.
हेही वाचा – मुग्धा वैशंपायनच्या बहिणीचा लग्नसोहळा थाटामाटात पडला पार, गायिका म्हणाली, “जीजूचा कान पिळताना आम्ही…”
लग्नसोहळ्याच्या निमित्ताने मालिकेतील कलाकार मंडळी सध्या विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना दिसत आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकताच ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी शुभांगी गोखलेंना स्वतःच्या दोन्ही हातांवर स्वतःचं मेहंदी काढताना पाहून तिने त्यांचं कौतुक केलं.
हेही वाचा – हेमंत ढोमे क्षिती जोगला ‘पाटलीण’ या नावाने का हाक मारतो? खुलासा करत म्हणाला, “लग्नानंतर…”
तेजश्री म्हणाली, “मस्त मेहंदी काढली आहे. मला शुभांगी ताईच्या सगळ्याचं गोष्टी आवडतात. ती खूप क्रिएटिव्ह आहे. आपल्याला फार माहित नसतं आपण तेवढ्याच गोष्टीचा विचार करतो, पण तिचं त्या भोवतीच्या चार गोष्टी आणि त्याच्यातून काय होऊ शकत? आणि काय होऊ शकत नाही? इथंपर्यंत विचार झालेला असतो. त्यामुळे मला खूप मज्जा येते. शुभांगी ताई स्वयंभू आहे. ती डाव्या हाताने पण उजव्या हातावर मेहंदी काढायला सक्षम आहे. दोन्ही हाताने करायला समर्थ आहे, स्वतःचं आणि दुसऱ्याचंही. तिचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतं. शुभांगी ताई सेटवर असले तेव्हा आमचे असिस्टंट पण आरामात असतील.”