गेल्या वर्षा अखेरीस ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मिहीर म्हणजे अभिनेता राजस सुळे लग्नबंधनात अडकला. नऊ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या चैत्राली पितळेशी राजसने लग्नगाठ बांधून आयुषच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. मोठ्या थाटामाटात राजस सुळेचं लग्न झालं होतं. त्यानंतर दोन महिन्यांनी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील आणखीन एक अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. तेजश्री प्रधानने अभिनेत्याचा लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस सुळेनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील लकी म्हणजे अभिनेता आयुष भिडे लग्नबंधनात अडकला आहे. आयुषने अभिनेत्री, डान्सर कोमल पटेल हिच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नात खास दोघांनी ऑफ व्हाइट रंगाचा पेहराव केला होता. आयुषची पत्नी कोमलने ऑफ व्हाइट रंगाचा भरजरी लेहेंगा घातला होता. ज्यावर तिने लाल रंगाची ओढणी आणि बांगड्या घातल्या होत्या. तर आयुष ऑफ व्हाइट रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आयुषच्या लग्नासाठी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कलाकारांनी खास हजेरी लावली होती. दिग्दर्शक विघ्नेश कांबळे, राज हंचनाळे, राजस सुळे, नरेंद्र केरेकर, इरा परवडे, कोमल सोमारे गजमल, लक्ष्मी चापोरकर हे कलाकार आयुषच्या लग्नात उपस्थित राहिले होते.

तेजश्री प्रधानने इन्स्टाग्राम स्टोरीवर आयुष भिडे व कोमल पटेलचा फोटो शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. तेजश्रीने फोटोवर लिहिलं, “आयुष तुला वैवाहिक जीवन आनंददायी जावो या शुभेच्छा.” तेजश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये आयुष व कोमलचा संगीत सोहळ्यातला लूक पाहायला मिळत आहे.

तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, आयुष भिडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आयुषने साकारलेली लकी ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. आयुष आता घराघरात पोहोचला आहे. याआधी आयुषने ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये काम केलं होतं. या मालिकेत त्याने निल कामतची भूमिका साकारली होती.

तसंच तो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत झळकला होता. त्याने ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत सुधीर ही भूमिका निभावली होती. याशिवाय आयुष ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत निराजी रावजी पंत भूमिकेत झळकला होता. आयुष अभिनयाबरोबरच नाटक दिग्दर्शन करतो. त्याने ‘घोर’ नावाचं दीर्घांक आणि ‘काठ’ नावाची एकांकिका दिग्दर्शित केली होती. यामध्ये त्याने स्वतः कामदेखील केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premachi goshta fame aayush bhide get married with komal patel pps