Premachi Goshta Serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये काही दिवसांपूर्वी मोठा बदल झाला. अचानक अभिनेत्री मृणाली शिर्केने मालिका सोडल्याचं समोर आलं. मिहिकाच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता बने ( Amruta Bane ) झळकली. पण मृणालीने मालिका सोडण्यामागचं अद्याप कारण स्पष्ट झालेलं नाही. तिचे अनेक चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडण्यामागचं कारण विचारत आहेत. मात्र मृणालीने याबाबत मौन पाळलं आहे. अशातच नव्या मिहिकाने म्हणजेच अभिनेत्री अमृताने बनेने नवरा शुभंकर एकबोटेसाठी नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अमृता बनेचा नवरा शुभंकर एकबोटे हा अभिनेता असून दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा मुलगा आहे. २१ एप्रिल २०२४ला अमृता व शुभंकर लग्नबंधनात अडकले. पुण्यात मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. आज शुभंकरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अमृताने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
अमृता बनेची पोस्ट वाचा…
अमृताने शुभंकरचे काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये बालपणीचा शुभंकर पाहायला मिळत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये अमृता व शुभंकर एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. तर तिसऱ्या फोटोमध्ये शुभंकरच्या मानेवर एक स्टिकर लावलं आहे. ज्यावर बेस्ट विशेश लिहिलं आहे. हे तीन फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं आहे, “आज तुझा जन्मदिवस आणि श्रावणी सोमवार एकत्र… वाहह… भारीच योगायोग…आणि त्यात ३०वा वाढदिवस म्हणजे…क्या बात…तिशी ओलांडल्यानंतरही मला माहिती आहे की तू अल्लड आणि निर्मळच राहशील…म्हणजे आशुआईच्या भाषेत (नादिष्ट) आणि…बाकी सगळं समोरा समोरच बोलू…वाढदिवसाच्या शुभेच्छा जोडीदार…”
अभिनेत्री अमृता बनेची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. चाहत्यांनी शुभंकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ( Premachi Goshta ) या मालिकेच्या आधी अमृता ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ मालिकेत झळकली आहेत. याशिवाय तिने ‘वैजू नंबर वन’, ‘रंग माझा वेगळा’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या.
© IE Online Media Services (P) Ltd