Premachi Goshta Fame Actress : गेल्या काही महिन्यांमध्ये सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी नवीन घरांमध्ये गृहप्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. शिवाली परब, भूषण प्रधान, रुचिरा जाधव, चेतन वडनेरे, रोहित माने, धनश्री काडगांवकर, मंगेश देसाई अशा बऱ्याच कलाकारांचा यात समावेश आहे. या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. मालिकाविश्वातील या लोकप्रिय अभिनेत्रीने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

‘प्रेमाची गोष्ट’ या ‘स्टार प्रवाह’वरील मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरांत लोकप्रिय आहे. याशिवाय ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा टॉप-५ मध्ये असते. याच मालिकेतील एका अभिनेत्रीने सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे.

selena gomez engaged
प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेजने उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा पती? जाणून घ्या
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर
priyanka chopra
लेक आणि पतीसह प्रियांका चोप्राची न्यूयॉर्क ट्रिप! चिमुकल्या मालतीला लावली खोटी नखं; फोटो व्हायरल
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?

हेही वाचा : “बाबा पहिल्यांदा मुंबईत आले तो क्षण…”, अंकिताची वडिलांसाठी भावुक पोस्ट; म्हणाली, “Bigg Boss मध्ये मला…

लोकप्रिय अभिनेत्रीचा नव्या घरात गृहप्रवेश

‘प्रेमाची गोष्ट’ ( Premachi Goshta ) या मालिकेत अभिनेत्री कोमल सोमारे गजमल ही ‘स्वाती’ची भूमिका साकारते. नुकतंच कोमलने नवीन घर खरेदी केलं. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्रीने नव्या घरात गृहप्रवेश केला. “जेव्हा स्वप्नपूर्ती होते, शुभ दसरा” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.

हेही वाचा : Natasa Stankovic with Elvish Yadav: वाढदिवस हार्दिकचा, नताशाची डिनर डेट एल्विश यादवबरोबर; नेटिझन्स म्हणाले, “आजच्याच दिवशी तुम्हाला…”

कोमलने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ ( Premachi Goshta ) मालिकेतील तिचे सहकलाकार तेजश्री प्रधान, अपूर्वा नेमळेकर, राज हंचनाळे यांनी देखील अभिनेत्रीच्या नव्या घराच्या फोटोंवर कमेंट करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Premachi Goshta Fame Actress
प्रेमाची गोष्ट मालिकेत स्वातीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल गजमल ( Premachi Goshta Fame Actress )

हेही वाचा : …अन् गौतमी पाटील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदमांच्या पडली पाया, नेटकरी म्हणाले, “एक मोठा कलाकार स्वतःहून…”

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ( Premachi Goshta ) ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर दररोज रात्री ८ वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये तेजश्री प्रधान, राज हंसनाळे आणि अपूर्वा नेमळेकर यांच्या व्यतिरिक्त शुभांगी गोखले, संजीवनी जाधव या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader