तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांना या मालिकेने चांगलं खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र आता घरोघरी पोहोचलं आहे. मग ती मुक्ता असो किंवा ती सावनी असो. प्रत्येक पात्रावर प्रेक्षक तितकंच प्रेम करताना पाहायला मिळत आहे. अशातच या मालिकेतील एक अभिनेत्री गेले अनेक वर्षांपासून घरगुती व्यवसाय करत असल्याचं समोर आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाकार व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करताना दिसत आहेत. अभिनय क्षेत्रातील काम सांभाळत हे कलाकार स्वतःचा व्यवसाय करत आहेत. अशाच प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेत्री मृणाली शिर्के देखील घरगुती व्यवसाय करत आहे.

हेही वाचा – अनंत अंबानी-राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात रिहाना, अरिजित सिंहसह ‘हे’ मराठी गायक करणार परफॉर्मन्स, यादी आली समोर

काही दिवसांपूर्वी मृणालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती कप केक बनवताना दिसत होती. याच व्हिडीओमुळे समोर आलं की, मृणालीचा स्वतःचा घरगुती व्यवसाय देखील आहे. तिचा बेकरीचा व्यवसाय आहे. Mru’s Bakery & Confections असं तिच्या बेकरी व्यवसायाच नाव आहे. मृणाली स्वतः घरात विविध प्रकारचे केक बनवून विकते.

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या दिग्दर्शकाची कामाप्रती निष्ठा, प्रेम पाहून तुम्ही कराल कौतुक, अपघात होऊनही…

दरम्यान, मृणालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेपूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘मेरे साई’, ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकांमध्ये मृणालीने काम केलं आहे. तसंच ती ‘हरिओम’ या चित्रपटात झळकली होती.

Story img Loader