अभिनेत्री तेजश्री प्रधान हा मराठी मालिकाविश्वातील सध्याचा लोकप्रिय चेहरा आहे. तेजश्रीची कुठलीही मालिका असो ती हिट होतेच. ‘होणार सून मी ह्या घरची’मधली जान्हवी असो किंवा ‘अग्गंबाई सासूबाई’ मधील शुभ्रा असो तिच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे.
सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतही तिने साकारलेली मुक्ता अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे आणि तिची ही मालिका देखील लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीची बहीण कोण आहे? ती काय काम करते? हे आज आपण जाणून घेऊया…
हेही वाचा – Video: …म्हणून ३७ वर्षांनंतर गोविंदाने पुन्हा केलं लग्न; माधुरी दीक्षित व सुनील शेट्टी होते हजर
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या बहिणीचं नाव शलाका प्रधान असं आहे. शलाका झगमगत्या दुनियेपासून दूर असून ती वाइल्ड लाइफ फोटोग्राफर आहे. शलाका ही नेहमी तिने काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या इन्स्टाग्राम पेजवर तुम्ही तेजश्रीच्या बहिणीने काढलेले सुंदर फोटो पाहू शकता. तेजश्री देखील बऱ्याचदा बहिणीने काढलेले फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत असते.
याशिवाय शलाका सोशल मीडियावर तेजश्रीच्या नवनवीन प्रोजेक्टच्या पोस्ट करून बहिणीला पाठिंबा देत असते. गेल्या वर्षी गणपतीमध्ये तेजश्रीने शलाकाबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये शलाका ही बापासाठी सजावट करताना दिसली होती.