Premachi Goshta Fame Apurva Nemlekar New Car : ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने साकारलेलं शेवंता हे पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. सध्या अपूर्वा ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सावनीची भूमिका साकारत आहे. हे पात्र खलनायिकेचं आहे. मुक्ता-सागरच्या संसारात दुरावा निर्माण करण्याचा सावनी पुरेपूर प्रयत्न करताना दिसते. अशा विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अपूर्वाने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

अपूर्वा ( Apurva Nemlekar ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकतीच एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रक्षाबंधन व श्रावणी सोमवारचं औचित्य साधत अभिनेत्रीने नवीन गाडी खरेदी केली आहे.

an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट
Women Gifted Herself Premier Padmini Vintage car
जेव्हा स्वप्न सत्यात उतरते…! वाढदिवसानिमित्त तिने स्वतःला गिफ्ट केली ‘ही’ व्हिंटेज कार; Video शेअर करत म्हणाली…
Umesh Kamat
Video: उमेश कामतने घेतली ‘ही’ बाईक; पत्नी प्रिया बापटसह केली पूजा, व्हिडीओ शेअर करत दाखविली पहिली झलक
Aai kuthe kay karte fame Rupali Bhosale bought a new mercedes benz
Video: “वेलकम बेबी…”, ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने घेतली मर्सिडीज बेंझ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आयुष्यात फक्त…”
Bollywood actress Mouni Roy falla down after celebrating New Year with husband Suraj Nambiar video viral
Video: न्यू इअरच्या पार्टीतून बाहेर येताच अभिनेत्री जोरात पडली, पतीने सावरत नेऊन बसवलं गाडीत, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : Video : लेकीला कडेवर घेत सासूसह दिल्या पोज! आलिया अन् राहा साजरं करणार रक्षाबंधन, मायलेकींचा पारंपरिक लूक चर्चेत

अपूर्वाने खरेदी केली नवीन गाडी

गाडी खरेदी करताना अपूर्वाचं ( Apurva Nemlekar ) संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. यावेळी नव्या गाडीची अभिनेत्रीने आपल्या कुटुंबासह पूजा केली. याची खास झलक तिने सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट देखील लिहिली आहे. अपूर्वा लिहिते, “रक्षाबंधन आणि तिसरा श्रावणी सोमवार या शुभमुहूर्तावर आम्ही ही नवीन गाडी खरेदी केली आहे. याक्षणी मी माझ्या भावाला अन् वडिलांना प्रचंड मिस करतेय…Miss you terribly Bhai And Pappa”

अपूर्वा नवीन गाडी खरेदी केल्याचा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच मराठी कलाकारांनी देखील अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे सातव्या वर्षात पदार्पण, कलाकार खास पोस्ट करत म्हणाले, “अजून ही हवेत न उडता..”

Apurva Nemlekar New Car
अपूर्वा नेमळेकरने घेतली नवीन गाडी ( Apurva Nemlekar New Car )

हेही वाचा : Bigg Boss Marathi- “टास्कमध्ये कपडे खेचणं कितपत योग्य?” निक्की अन् जान्हवी ‘डर्टी गेम’ खेळतात; घराबाहेर येताच योगिता चव्हाणचा खुलासा

दरम्यान, अपूर्वा नेमळेकरच्या ( Apurva Nemlekar ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर “आभास हा”, “रात्रीस खेळ चाले” या मालिकांमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची अपूर्वा उपविजेती ठरली होती. सध्या अभिनेत्री ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत खलनायिका सावनीची भूमिका साकारत आहे.

Story img Loader