‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. तसंच मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. त्यामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे.

लोकप्रियतेचा शिखरावर असतानाच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मोठा बदल झाला. मालिकेतील प्रमुख भूमिकेत म्हणजेच मुक्ता म्हणून आता अभिनेत्री स्वरदा ठिगळे पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे सूर पसरले आहेत. पण आता स्वरदा मुक्ता म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच दुसऱ्या बाजूला सावनी म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ

अपूर्वाची खास मैत्रीण सायली नातूने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अपूर्वा आणि सायली रेखा यांच्या लोकप्रिय गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. दोघींच्या नृत्य आणि अदाकारीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. रेखा यांच्या ‘इन आँखों की मस्ती’ या गाण्यावर अपूर्वा आणि सायली नृत्य केलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओवर काही कलाकारांसह नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अपूर्वाच्या नृत्याचं आणि अदाकारीचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. “वाह वाह…खूप छान”, “खूप सुंदर”, “सुपर”, “ताई तुम्ही दोघींनी खूप छान नृत्य केलं”, “प्रत्येक स्टेप्स आणि हावभाव खूपचं सुंदर आहे…मी सतत व्हिडीओ पाहत आहे”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – बॉलीवूडच्या फ्लॉप हिरोच्या दुसऱ्या पत्नीने स्वीकारला इस्लाम धर्म, अभिनेत्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी आहे लहान

दरम्यान, अपूर्वा नेमळेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने बऱ्याच मालिकांसह काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘आभास हा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अपूर्वा ‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंताच्या भूमिकेमुळे अधिक प्रसिद्ध झोतात आली. त्यानंतर अपूर्वा ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात झळकली. सध्या अपूर्वा ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सावनी या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे.

Story img Loader